क्रिकेट
इंग्लंडच्या बेन स्टोक्स याचा निवृत्तीवरुन यूटर्न, न्यूझीलंड विरुद्ध खेळणार
लंडन | आगामी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या क्रिकेट विश्वातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट टीमच्या स्टार ऑलराउंडर खेळाडूने निवृत्तीवरुन यूटर्न घेतला आहे. क्रिकेट वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून हा दिग्गज लवकरच वनडे क्रिकेटमधून रिटायरमेंटचा निर्णय मागे घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर या ऑलराउंडरने निर्णय फिरवत टीमला मोठा दिलासा दिला आहे. निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याने आता हा खेळाडू वर्ल्ड कपमध्ये खेळणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे टीमची ताकद झटक्यात दुप्पट झाली आहे.
बेन स्टोक्स याने निर्णय फिरवला
इंग्लंड क्रिकेट टीमचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. बेन स्टोक्स न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतून वनडे क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे. इंग्लंड क्रिकेट टीमने न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता बेन स्टोक्स इंग्लंडसाठी वनडे क्रिकेट खेळणार आहे. बेन स्टोक्स जुलै 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध अखेरचा वनडे सामना खेळला होता.