नाशिक – ब्राह्मण व्यवसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल ( बीबीएनजी ) तर्फे 8 वी आंतरराष्ट्रीय व्यवसायिक परिषद ‘ परिवर्तन ‘ येत्या ४ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथील गुरुदक्षिणा हॉल येथे होणार असून या परिषदेसाठी जगभरातील नामवंत ब्राह्मण उद्योजक येणार असल्याची माहिती बीबीएनजी चे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली .
उद्योजकाचे देशाच्या विकासात मोलाचे योगदान असून देशाचे अर्थकारण व रोजगार निर्मिती मध्ये देखील उद्योजकांची महत्वाची भूमिका असते . या परिषदेचा उद्देश व्यवसायाच्या वाढीसाठी विचारमंथन , गुंतवणूकदारांच्या बैठका, खास आयोजित केलेल्या B2B मीटिंग्ज, बिझनेस इंटरएक्टिव्ह सेशन्स, नामवंत व्यावसायिकांचे मार्गदर्शन आणि विविध उद्योजकांशी थेट संवाद असा असल्याचे देखील त्यांनी नमूद केले..
गेली 8 वर्षापासून ही परिषद दरवर्षी देशातील प्रमुख शहरात आयोजित करण्यात येते. नाशिक पासून सुरू झालेल्या या संस्थेची या वर्षीची परिषद आयोजित करण्याचा बहुमान या वर्षी नाशिक ला मिळाला आहे.
या वर्षी या परिषदेसाठी रवींद्र साठ्ये (अध्यक्ष, खादी आणि ग्रामोद्योग ) , विश्वास पाठक ( संचालक महावितरण ) डॉ. अशोक जोशी (अमेरिका), डॉ. विजय जोशी (सिडनी, ऑस्ट्रेलिया), डॉ. संजय पैठणकर (यूएई), आनंद गानू (गर्जे मराठी यूएसए), विष्णू मनोहर , भाजपा नेते सुनील देवधर, उद्योजिका अलिका किर्लोस्कर, पत्रकार उदय निरगुडकर, गिरीश चितळे , रवींद्र प्रभुदेसाई , असे जगभरातील आपापल्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीं उपस्थित राहणार आहेत.
या एकदिवसीय परिषदेत, उद्यम कौशल (ब्राह्मण शार्क टँक), उद्यम कौस्तुभ अवॉर्ड शो आणि विविध उद्योजकांना भेटण्याच्या आणि नेटवर्कच्या संधींद्वारे नवनवीन उत्पादनांचे लाँचिंग तसेच उद्योजकीय कौशल्यांचे प्रदर्शन होणार आहे.
परिषदेत फूड व कृषी उद्योग , इन्फ्रास्ट्रक्चर, मीडिया व ब्रॅण्डिंग, जागतिक व्यवसाय संधी अश्या विविध विषयावर तज्ञ मार्गदर्शन करणार असून अधिक माहिती साठी 9822753226 येथे संपर्क साधावा असे आवाहन परिवर्तन परिषदेचे प्रमुख व विभागीय संचालक डॉ.अभिजीत चांदे यांनी केले आहे.
परिषद यशस्वी होण्यासाठी मुकुंद कुलकर्णी, अरविंद कोराळकर , मधुरा कुंभेजकर,सुयोग नरवणे , महेश देशपांडे, नितीन बेळे, डॉ.संदीप चिंचोलिकर, अक्षय जळगांवकर, रसिका कुलकर्णी, जगदीश कुलकर्णी, पूनम शुक्ल, अमोल अबोटी, वैशाली सायंदे,श्रेयस कुलकर्णी, गौरव खिस्ते, हिमांशू कुलकर्णी तसेच सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.