बालवाड्.मय कार्यशाळेत प्रा.डॉ .पृथ्वीराज तौर यांचे मत
उदगीर (वार्ताहर )
बालसाहित्य हा साहित्य प्रवाहाचा भाग नसून बालसाहित्य हे स्वतंत्र विश्व आहे, अशा शब्दांत मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी बालसाहित्याची आग्रही गरज प्रतिपादित केली.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महेश प्राथमिक विद्यामंदिर उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बाल वाड.मय कार्यशाळेत ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून जेष्ठ साहित्यिक प्रा. देविदास फुलारी, राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर,
संस्थापक अध्यक्ष टी. व्ही. बिरादार, अध्यक्षा मंगला शेटे, सचिव प्रविण बिरादार, मुख्याध्यापिका प्रतिभा बिरादार, प्राचार्य शोभा कल्याणी, डॉ. सुरेश जोंधळे आदी उपस्थित होते. प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना प्रा. डॉ. तौर म्हणाले, बालकांना गांभीर्याने घ्यायचे नसते ही बाबच आपल्या बालसाहित्यविषयक दृष्टिकोनाला सिध्द करते. बालकांच्या गरजाच आपण समजून घेत नसू तर मग बालसाहित्याकडे आपण किती गांभीर्याने बघू?असा सवाल उपस्थित केला. अध्यक्षीय समारोपात धनंजय गुडसूरकर म्हणाले, उदगीर ही बाल साहित्याची पंढरी बनत असल्याचे सांगून ही कार्यशाळा बाल साहित्याला अधिक बळ देणारी ठरणार असल्याचे सांगीतले. यावेळी मंगला शेटे यांच्या ‘मंगल गाणी दंगल गाणी’ या बालकविता संग्रहाचे प्रकाशन झाले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्रतिभा बिरादार यांनी केले. सूत्रसंचालन श्रीपाद सिमंतकर यांनी तर आभार रसूल पठाण यांनी मानले. महेश प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. अशोक देवंग्रे , एन जी जावरे, ए.टी गायकवाड आर .एस .कांबळे.
आर .डी .होनराव, एन .डी .भिंगोरे,
सुर्यवंशी, हल्लाळे शिंदे कोनाळे
बने, थोटे आदींनी पुढाकार घेतला.
बालसाहित्य हे साहित्याचे स्वतंत्र विश्व
डॉ. प्रथ्वीराज तौर