26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसामाजिकबाभळगावात विविध विकास कामांचा शुभारंभ

बाभळगावात विविध विकास कामांचा शुभारंभ

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत बाभळगाव येथील विविध विकास कामांचा शुभारंभ

लातूर प्रतिनिधी 

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत आज शनिवार दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील बाभळगाव ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला 

यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल ,जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंके जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख व्हाईस चेअरमन रवींद्र काळे उपसभापती मनोज पाटील दगडूसाहेब पडीले बाभळगावचे सरपंच प्रिया मस्के उपसरपंच गोविंद देशमुख सचिन मस्के तहसीलदार स्वप्निल पवार उपविभागीय अधिकारी सुनील यादव लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष बोडके मनपा विरोधी पक्षनेते दीपक सूळ,रविशंकर जाधव,उपसभापती मनोज पाटील, चेअरमन गणपत बाजूलघे कल्याण पाटील,जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, श्याम देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, अविनाश देशमुख,गोपाळ थडकर अशोक नाडागुडे जहांगीर पठाण  काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते संबंधित विभागाचे अधिकारी बाभळगावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य,नागरिक उपस्थित होते.

बाभळगाव येथील चावडी परिसरात सिमेंट रस्ता व नाली करणे, हनुमान मंदिर ते सिरसी रोड सिमेंट रस्ता करणे ,महादेव मंदिर ते  ओम सगर घरापर्यंत पेव्हर ब्लॉक रस्ता करणे, विंधन विहीर घेणे, घनकचरा व्यवस्थापन करणे, गौंड वस्तीमध्ये सिमेंट रस्ता करणे, वैशाली नगर जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे आदी  एकूण 75 लाखांची कामे करण्यात येणार आहेत.

यावेळी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की ग्रामपंचायत विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्यात येत आहे कोट्यावधीची विकास कामे करण्यात येत आहेत बाभळगाव ला सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील एक अग्रगण्य गाव म्हणून नावारूपाला आणणार आहोत. सुजलाम-सुफलाम बाभळगाव करणे यासाठी ग्रामपंचायत काम करणार आहे असे सांगून बाभळगाव च्या वाड्यावर लोकनेते विलासराव देशमुख यांचे जन्मगाव म्हणून कोणशीला लावावी अशी सूचना त्यांनी संबंधितांना केली

 पुढे बोलताना म्हणाले की शहरालगतच्या गावांना पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्याचा प्रयत्न करू गावच्या शेजारी बेकायदेशीर प्लॉट विक्री होऊ देऊ नये याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली बेरोजगारी वाढली आहे महिला पुरुष यांना काम देण्याचे प्रयत्नही ग्रामपंचायतीने करावे तसेच जिल्हा परिषदेच्या योजनेचा लाभ ग्रामपंचायतीने सर्वांना करून द्यावा अशी सूचना  त्यांनी केली

 ते म्हणाले की  सर्वांनी शासनाचे काम तळागाळापर्यंत घेऊन जावे घरकुल योजना कबाले प्रश्नसाठी पाठपुरावा चालू आहे.गावातील विविध रस्त्यांची कामे हाती घेतलेली आहेत तालुक्यात व जिल्ह्यात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. लातूर मनपा ने महिलांना सिटी बस प्रवास मोफत केला आहे असा प्रवास देणारी देशातील पहिली महानगरपालिका ही लातूर महानगरपालिका म्हणून ओळखली जानार आहे याचा गावातील महिलांनाही लाभ घेता येईल सौरऊर्जेचे पथदिवे वृक्षलागवड कामे हाती घेण्यात यावी 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण करून घ्यावे चौथी करोणाची लाट येईल असे तज्ञ भाकीत करत आहेत असे सांगून वैद्यकीय शिक्षणाच्या जे शक्य असलेल्या संस्था बाभळगाव मध्येही सुरू करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

 लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख म्हणाले की महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे सरकारने आरोग्यावर सर्वात जास्त निधी खर्च केला लातूर जिल्ह्यात आरोग्याचे चांगले काम झाले ऑक्सिजनने जिल्हा स्वयंपूर्ण झाला आहे ग्रामपंचायतींनी सौरऊर्जेने गावे स्वयंपूर्ण करावीत प्रत्येकाने सौरऊर्जेचा वापर करावा असे ते म्हणाले

 पुढे बोलताना ते म्हणाले की महा विकास आघाडी सरकारने प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे सत्तर तीस या निर्णयाचा लाभ आपल्या भागातील विद्यार्थ्यांना झाला आहे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम चालू आहे बाभळगावसाठी हक्काचे नर्सिंग कॉलेज द्यावे व लातूर तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल करावे अशी मागणी त्यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली.

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी आपले मनोगत व्यक्त करून जिल्हा परिषदेच्या व शासनाच्या सर्व योजनांची माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाभळगाव चे उपसरपंच गोविंद देशमुख यांनी करून सुरु असलेली विकास कामे प्रस्तावित विकास कामे आदींची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर दुष्यंत कटारे यांनी केले तर शेवटी आभार ग्रामसेवक अनंत मडके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]