बाभळगाव येथील दसरा साधेपणाने साजरा-आ.धिरज देशमुख
लातूर-( प्रतिनिधि )-बाभळगाव च्या दसऱ्याची व इथे दरवर्षी हर्षोल्हासात साजरा होणाऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा सर्वश्रुत आहे. ही परंपरा जपत पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने हा उत्सव आज आम्ही साजरा केला व सर्व ग्रामस्थांना दसऱ्याच्या लातूर ग्रामीणचे आ.धिरज विलासराव देशमुख यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.
एकता जपणारा व आनंदाचे प्रतीक असलेल्या इथल्या दसऱ्याची ऐतिहासिक परंपरा आमचे आदरणीय दादा (दगडोजीराव देशमुख) यांच्यापासून चालत आली आहे. ती पुढे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जपली. फुलवली. साहेब कुठल्याही पदावर असो, कुठेही असो, या दिवशी ते हमखास बाभळगावमध्ये येत. त्यामुळे त्यांची आणि दादांची आठवण आज प्रकर्षाने जाणवते असेही आ.धिरज विलासराव देशमुख यांनी आठवणींना उजाळा दिला.
मागच्या वर्षी कोरोनामुळे हा उत्सव आम्ही रद्द केला होता. अजूनही कोरोना पूर्णपणे संपला नाही. त्यामुळे यंदाही मेळावा रद्द करून अतिशय साधेपणाने हा उत्सव आज साजरा केला. विजयाच्या क्षणी साथ देणाऱ्या अश्वाची व शस्त्रांची आईंसमवेत मनोभावे पूजा केली. सर्वांना आरोग्यदायी आयुष्य लाभू दे, अशी प्रार्थना आ.धिरज देशमुख यांनी केली आहे.