*शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे*
वाढदिवस विशेष
प्रथमतः बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण आदर आणि प्रेमाने त्यांना बाबासाहेब पुरंदरे या नावाने संबोधतो वस्तुतः त्यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे आहे .यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड होय. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 मध्ये झाला इतिहासाविषयी अभिमान सत्यासत्यता तपासण्यासाठी जी संशोधक वृत्ती, संयम ,चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा -वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे .या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्लेषण क्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन प्रतिभा व वक्तृत्व कला हे गुणविशेष हेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासक, अभ्यासासह शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्ये ,तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले .व भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करू लागले याच ठिकाणी वरिष्ठ इतिहाससंशोधक ग .ह .खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली .
पुणे विद्यापीठाच्या मराठा इतिहासाची शकावली सन 17 40 ते 17 61 या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 2015 सालापर्यंत व बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत शिवाय आपले मेहुणे श्री. ग .माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस ‘मध्येही काम करत होते .ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी .दांडेकर यांची पुढे त्यांच्याशी भेट झाली. ते नेहमी गडावर एकत्र भटकंती करीत .बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळवण्यासाठी लढल्या गेलेल्या दादर नगर हवेली मुक्तिसंग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडके यांच्याबरोबर हिरीरीने सहभागी होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवरील वर्णनात्मक लेखन ,ललित ,कादंबरी तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकांचे दिग्दर्शन केले .पुरंदरे यांनी पुरंद-यांची दौलत ,पुरंद-यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य, गडसंच ,शेलारखिंड, राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आज वर प्रकाशित झालेले साहित्य होय .शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हेच ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमातून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या 16 आवृत्ती आजपर्यंत पाच लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत .याच बरोबर फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली व दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्यातून गेल्या 27 वर्षात 12 50 हून अधिक प्रयोग झाले.त्याचा पहिला प्रयोग 14 एप्रिल इसवी सन 1984 साली झाला होता .या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक हिंदी, इंग्रजीसह अन्य पाच भाषांत भाषांतरित केले गेले आहे .जाणता राजा मध्ये 150 कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती-घोडे ही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठी मैदाने लागतात आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी दहा दिवस आणि उतरवण्यासाठी पाच दिवस लागतात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र प्रचारासाठी काही उपक्रम चालवले महाराष्ट्रात ,भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानातून आणि जाणता राजा या महानाट्यातून आजही छत्रपती शिवरायांचे चरित्र जिवंत होते .हे चरित्र व्यक्तीचे चरित्र निर्मिती चा अभ्यासक्रम आहे हे त्यांनी त्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत आपल्या व्याख्यानातून पटवून दिले .
बाबासाहेबांना पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिदागी तून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले. महाराष्ट्र भूषण या सन्माना बरोबर दहा लाख रुपये मिळाले यातले फक्त दहा पैसे स्वतःजवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखी पंधरा लाख रुपये घालून ती सर्व रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला त्यांनी दान केली. बाबासाहेब पुरंदरे यांनी इसवी सन 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच इसवी सन 2015 मध्ये महाराष्ट्रभूषण हा सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आले. बाबासाहेब पुरंदरे यांना 19 ऑगस्ट 2015 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या दिवशी श्रावण शुद्ध चतुर्थी होती तो दिवस बाबासाहेबांच्या तिथीने 93 वा वाढदिवस होता .तसेच त्यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार सन 2012 मध्ये प्रदान करण्यात आला. डी वाय .पाटील यांच्या अभिमत विद्यापीठ आहे त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल डि लीट ही पदवी प्रदान केली .तसेच गार्डियन गिरिप्रेमी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे
राजमाता सुमित्राराजे भोसले ,माझी राष्ट्रपती प्रतिभा पाटील ,माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ,इतिहाससंशोधक न. र. फाटक ,कवी कुसुमाग्रज ,सेतुमाधवराव पगडी, आचार्य अत्रे ,शिवाजीराव भोसले, नरहर कुरुंदकर, लता मंगेशकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर ,डॉक्टर विजय भाटकर आदी नामवंत यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे .बेलभंडारा या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्र डॉक्टर सागर देशपांडे यांनी लिहून प्रसिद्ध केले आहे अशा या प्रेरणा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला शतशः नमन !