दिन विशेष
आजवर समाजात काय घडलय किंवा समाजात काय घडतय याचा संबध स्पर्धा परिक्षांसाठी असेल तर इतिहासाच्या सनावळया अभ्यासासाठी आवश्यक असतील मात्र घरात महत्वाचा आहे तो आपल्या घराचा इतिहास… काळाच्या ओघात अंतर पडलं किंवा अंतरे वाढली ही स्थिती आज दिसत आहे. कौटुंबिक व्यवस्था मोठया स्थित्यंतरातून जात आहे. या स्थितीत अधिक महत्व आपण कुटुंबाला दिले पाहिजे… आणि या कुटुंबाचा प्रमुख म्हणून जी व्यक्ती आपली जबाबदारी मानते आणि निभावते ती व्यक्ती म्हणजे बाप नावाची शक्ती होय.
हल्ली दिवस साजरे करण्याचं फॅड आलं आहे. यानुसार फादर्स डे सारे जण साजरा करतील. फादरला छान-छानशा भेटवस्तू आणि फुलांचे बुके देतील. मात्र त्यात नेमकेपणाने किती खरेपणा आहे हे आपण तपासून घ्यायला हवं.
ससांरातील वाटचालीत आजवर त्याची भूमिका कशी बदलली आणि का बदलली याचं कारण आपण मुलांना दिलं पाहिजे…व्यक्ती वयाने मोठी न होता ती मनापासून असणाऱ्या आदरातून मोठी झाली पाहिजे… बाप हे असं एक व्यक्तीमत्व असतं.
बाप प्रसंगी माया नसेल कदाचित पंरतु बाप हा कुटुंबाची छत्रछाया नक्कीच असतो…. स्वत:च्या इच्छा… अपेक्षा आणि आकांक्षांना गुंडाळून ठेवत मुलांसाठी मायेची ऊब देताना ती स्वत: ऊन-वारा पाऊस यांचा मारा सहन करीत फाटक्या-तुटक्या वेषात उभा अंगणात दिसतो … तो बाप असतो. बापाची व्याख्या व्यक्तीनुरुप बदलत जाणार आहे. मात्र आपली पुढची पिढी वरच्या स्तरावर जाईल असं स्वप्न उराशी बाळगत मेहनत उपसत राहणारी व्यक्ती म्हणजे बाप माणून म्हणता येईल.
गेल्या काही पिढयांकडे बघताना जाणवतं की, बाप म्हणजे धाक ही भावना आधिच्या पिढीत होती. त्याच्या नजरेला नजर देण हे कदाचित व्हायचं…
क्वचितप्रसंगी या दोघांमध्ये संवादाचे प्रंसग यायचे त्यातही वादाला प्रथम स्थान कारण अर्थात जनरेशन गॅप…आमच्या काळात आम्ही छडी लागे छम…छम… असं म्हणत विद्याग्रहण केलं आणि तुमच्या जमाना वेगळा आहे ही बापाची भूमिका तर….. बाबा काळ खूप झपाटयाने बदलला आहे… ही नव्या पिढीची भूमिका…मग तडजोड करायची कुणी यावर अहं च्या वादातून जनरेशन गॅप सुरु होते आणि ती जनरेटेड गॅप असावी अशी जपली जाते हे देखील एक वास्तव आहे.
माझं वैयक्तिक मत हेच की , मोठयांसमोर झुकण्यात तो कमीपणा कसला ? …. याचं स्वरुपाचं सुंदर चित्रीकरण मोहबतें चित्रपटात आपणास दिसतं…. मोठया माणसानं जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती निश्चितपणे लहान होत नाही पण त्यात सोपा उपाय अर्थातच लहानांनी झुकाव…मोठयांना समजून घ्यावं..
दोन पिढयांमध्ये सर्वच बाबतीत पडणारं अंतर ही नैसर्गिक बाब आहे… यात झुकेका कौन…. ? असा सवाल दोन्ही पिढयांनी टाळला तर अधिक उत्तम होईल…..जुन्या नव्याच्या संघर्षात न पडता आहे ते नाते मनापासून स्विकारणं महत्वाचं ठरतं… जुन्या पिढीला तंत्र आणि यंत्र यातील प्रगती कळत नाही हा त्यांचा दोष
नाही. ते तंत्र त्यांच्या काळात असंत तर त्यांनीते नक्की आत्मसात केलं असतं…. डॅड तुम्हाला मोबाईल सुध्दा वापरता येत नाही असं म्हणणाऱ्या पिढीनं वास्तव जाणलं पाहिजे की त्या बापाच्या काळात साधा फोन देखील दुरापास्त होता. यात नव्या पिढीची भूमिका खूप महत्वाची आणि मोलाची ठरते. जुन्या पिढीला अद्ययावत करणं ही जबाबदारी नव्या पिढीची ठरते याची जाण आपण ठेवावी.
यात जुन्या पिढीला देखील आपली भूमिका तपासून एक पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता आहे. कारण मुलांना घडवताना त्या पिढीने जगायचं सारं तंत्र शिकवलय मात्र तंत्राच्या गतीने काळ आता इतका बदलला आहे की नव्या जगातील व्यवहाराशी जुळवून घेण्यासाठी त्यांनाही नव्या पिढीची आवश्यकता भासणार आहे. कारण हे सहजीवन आहे… समाजातील बदलांचे परिणाम दोन्ही पिढययांवर सारखेच होणार आहेत.
अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर ते ATM कार्ड वापराचं घेता येईल… ATM कार्ड वापराची भिती वाटते म्हणून तासंन तास बँकेत बसणारे पेन्शनर्स किती दिवस याला टाळू शकतील… मुलाला चालायला शिकवलं त्यावेळी जो आनंद होता त्याच आनंदाची अनुभूती आता नव्या पिढीला व्याजासह परत द्यायची ही वेळ आहे… म्हणतात ना प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या कोणत्या -ना-कोणत्या वळणावर नव्याने आणि पहिल्यांदा शिकत असतो.
आजजी पिढी तारुण्यात आहे त्यांनाही लक्षात ठेवावं लागेल की आज ते शिखरावर आहेत मात्र अंगणात आणि पाळण्यात खेळणारी त्यांची नवी पिढी लवकरच त्यांची जागा घ्यायला समोर येणार आहे. त्यामुळे कौतुकाने हुरळून जाणं आणि आपल्या ज्ञानाची फुशारकी मारणं या अगदीच क्षणभंगूर बाबी आहेत या आयुष्याच्या प्रवासात…
तुम्हाला ज्यांनी घडवलं त्यांना बदलत्या काळानुरुप बदलण्यास मदत करणं आणि नवी पिढी घडवताना भविष्यात आपल्यालाही अनेक बाबी नव्या पिढीकडून शिकाव्या लागतील, अद्ययावत रहावं लागेल आणि भविष्यात अद्ययावत व्हावं लागेल याचं भान ठेवणं अन् जुन्यांचा नव्यांमध्ये संगम घडवणं म्हणजे खरा
Fathers day…. ठरेल.
बदल हा जगाचा स्थायीभाव आहे आणि तेच एकमेव सत्य देखील … अर्थात हा भगवद् गीतेचा संदेश जितका मोठा बदल, तितका मोठा विरोध हे वास्तव. रेल्वे देखील रुळ बदलताना मोठा खडखडाट करते… याला दुसरा पर्याय नाही… या खडखडाटाची पर्वा न करता जुन्या पिढीची गाडी योग्य ट्रॅक वर आणणं हा आपला खरा
Fathers day . Wish All fathers ………A VERY VERY Happy Fathers Day.
प्रशांत दैठणकर
९८२३१९९४६६