26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeकृषी*बाजार समितीच्या भंडारा कार्यक्रमास आ.देशमुखांची उपस्थिती*

*बाजार समितीच्या भंडारा कार्यक्रमास आ.देशमुखांची उपस्थिती*

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक भंडारा कार्यक्रमास माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा

लातूर प्रतिनिधी :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज शनिवार दि. 22 जुलै रोजी दुपारी लातूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक भंडारा उत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख कार्यक्रमात उपस्थित राहू यावर्षी पर्जन्यमान चांगले होऊन भरगोस शेती उत्पादन मिळावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. कष्टकरी,शेतकरी,व्यापारी या सर्वांना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. तसेच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कायम शेतकरी कष्टकऱ्यांचे हित जपले आहे.भविष्यकाळातही तीच परंपरा पुढेच  चालू राहील, लातूरच्या बाजारपेठेचा लौकिक आणखीन वाढत राहावा यासाठी येथे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही याप्रसंगी बोलताना दिली.


यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा, माजी उपसभापती मनोज पाटील, माजी महापौर विक्रांत गोजमगुडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सुळ, रमेश सूर्यवंशी, सुधीर गोजमगुंडे, बालाप्रसाद बीदादा, संजय शिंदे, हर्षवर्धन सवइ माजी नगरसेवक रविशंकर जाधव, इमरान सय्यद, विजयकुमार साबदे,युनूस मोमीन, संजय शिंदे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक दुधाटे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.


पुढे बोलताना ते म्हणाले की आजचा भंडारा कष्टकऱ्यांसाठी नैवेद्य म्हणून दिला जातो या बाजारपेठेची ठेवी 100 कोटी पर्यंत गेली आहे.या ठेवीकडे अनेक लोकांचे डोळे लागले आहेत ज्या संस्थेत चांगले काम झाले आहे या बाजारपेठेला खूप पुढे घेऊन जायचे आहे येथे रस्ते नाल्या वीज शौचालय करायचे आहे मूलभूत गरजा या ठिकाणी विकसित झाल्या पाहिजेत तिथल्या पायाभूत सुविधांसाठी प्रस्ताव तयार करा अशी सूचना त्यांनी प्रशासक दुधाटे यांना केली.

मतदार नेहमी चांगले काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी असतात नव्या दिशेने या बाजारपेठा पुढे घेऊन आपणाला जायचे आहे. पाऊस सध्या चांगला पडत आहे नद्या भरून वाहत आहेत. जवळपास 50% अधिक पर्जन्य झाले आहे. सार्वजनिक सत्यनारायण भंडारा उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना सुखी आनंदी जीवन लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे सांगून त्यांनी उपस्थित नागरिकांना भंडारा उत्सवाचा प्रसाद वाटप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]