राज्य मंत्रिमंडळाने १५ दिवसात १५६पेक्षा अधिक निर्णय घेतले
पुन्हा निवडून येणार नाही यामुळे असे निर्णय झाले
– सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्याराष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब वसतीगृह व गुमास्ता भवनचे लोकार्पण
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर (प्रतिनीधी) : शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर २४
आज देशात व राज्यात जे काही चालले आहे ते कायद्याची, नीतिमत्तेची मोडतोड करून चालले आहे याचा विचार सर्वांनी करावा असे सांगून राज्य मंत्रिमंडळाने या १५ दिवसात १५६ पेक्षा अधिक निर्णय घेतले आहेत, सत्ताधाऱ्यांना माहित आहे, आपण पुन्हा निवडून येणार नाही यामुळे असे निर्णय झाले आहे असे सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लातूर शहरातील गूळ मार्केट येथे शेतकऱ्यांच्या मुलींसाठी उभारण्यात आलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब वसतीगृहाचे व राष्ट्रीय गुमास्ता मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लातूर येथील गुमास्ता भवनचे सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुक्रवार दि. ११ ऑक्टोंबर रोजी सकाळी लोकार्पण करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, माजी सभापती ललितभाई शहा, चेंबर असोसिएशन अध्यक्ष पांडुरंग मुंदडा, आबासाहेब पाटील, श्रीपतराव काकडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, राष्ट्रीय गुमास्ता मंडळ अध्यक्ष तुळशीराम गंभीरे, समद पटेल, विजय देशमुख, संतोष देशमुख, रवि काळे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव अरविंद पाटील, सहसचिव सतीश भोसले, सहाय्यक सहसचिव भास्कर शिंदे, आडत असोसिएशन अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनोज पाटील आदीसह आडते, व्यापारी, गुमास्ता, हमाल मापडी शेतकरी उपस्थित होते.
राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब मुलींचे वसतिगृहात मुलींना राहण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक खोलीत प्रकाश व्यवस्था चांगली आहे, अभ्यासीका, दर्जेदार फर्नीचर आणि खुली हवा आहे. यासोबतच, मुलींना अभ्यासासाठी शांत वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सर्व व्यवस्थेची सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पाहणी केली.
सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतूनच माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. तेव्हा माझे वय 23 वर्षे होते शेड हॉल बाजार समितीची ईमारत नाट्यगृह हे तेव्हा बांधले आहे. आज बाजार समितीचे २६ कोटी रुपये उत्पन्न झालेले आहे. एमआयडीसी परिसरात नवीन अद्यावत बाजारपेठ आंतरराष्ट्रीय स्वरूपाची होत आहे. मुलींच्या वस्तीगृहात माफक दरात त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सागीतले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकसाठी काम केले. त्यांच्या पहिल्या गुरु राष्ट्रमाता जिजाऊ होत्या त्यांच्या शिकवणीनुसारच आपण सर्वांनी कार्य करावे असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख यांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन लातूरचा विकास केला, विकासाची, सदभावाची पेरणी प्रत्येकाच्या मनात त्यांनी केली. मार्केट यार्ड हे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येण्याचे ठिकाण आहे. शेतकरी, आडते, व्यापारी यांच्यातील विश्वासाची भूमिका ही गुमासतेची आहे. लातूरच वेगळेपण आपण सर्वांनी टिकविले पाहिजे, काँग्रेस पक्षाने व लोकनेते विलासराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांची जात न बघता मदत केली, देशात व राज्यात जे काही आज चालले आहे ते कायद्याचे नीतिमत्तेची मोडतोड करून चालले आहे. राज्य मंत्रिमंडळाने या १५ दिवसात १५६ निर्णय घेतले आहेत सत्ताधाऱ्यांना माहित आहे, आपण पुन्हा निवडून येणार नाही असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की येत्या विधानसभा निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवाराला निवडून द्या लोकसभेला आशीर्वाद दिला त्याच्यापेक्षा दुप्पट आशीर्वाद विधानसभेला द्या महायूतीच्या सरकारला दुरुस्त करता आता येणार नाही त्यामुळे त्याला बदलून टाका असे ते म्हणाले.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील नावाजलेली बाजार समिती आहे. या बाजार समितीच्या पुढाकाराने या परिसरात नव्या वास्तू उभ्या राहत आहेत, म्हणून आज आनंदाचा दिवस आहे. ही बाजार समिती समाजातील सर्व घटकांना समोर ठेवून काम करते, लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचे स्वप्न होते लातूरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभे करणे. ती कामाला सुरुवात झाली आहे. रस्ते, वीज, नाल्या पथदिवेची कामे प्रगतीपथावर आहेत, नवीन बाजारपेठेचे कामही चालू आहे, तेथे जाणाऱ्या अडत्यांची नोंदणी उद्यापासून सुरू होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महायुती सरकारने सर्व घटकावर अन्याय केला
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मुलीसाठी
उभारलेले वस्तीगृह हे राज्यातील पहिले वस्तीगृह
माजी मंत्री आमदार अमित देशमुख
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते यांना जागा उपलब्ध करून द्यावी अशी त्यांची मागणी आहे, लवकरच त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल. मुलांच्या वस्तीगृहाचीही दुरावस्था झालेली आहे, असे तेथील विद्यार्थ्यांनी मला सांगितले आहे, लवकरच तेथे दुरुस्ती करण्यात येईल. सध्या राज्यात आरक्षणाच्या संदर्भात अनेक आंदोलने झाली केंद्र व राज्य सरकार आरक्षणाचे राजकारण करत आहे, सध्या शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मुलीसाठी उभारलेले वस्तीगृह हे राज्यातील पहिले वस्तीगृह आहे. लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी आपणाला अनेक वर्ष जपले, दोन रुपये वर्गणी जमा करून गुमासत्यांनी निधी उभा केला, लातूरच्या विकासात राजकारण आडवे आणायचे नाही, लातूरचे हित प्रथम आपण जपले पाहिजे. येत्या काही दिवसात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल महायूती सरकारने सर्व घटकावर अन्याय केला आहे, आपणाला सामान्य जनतेचे महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणायचे आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सर्वश्री आनंद पाटील, श्री. तुकाराम गोडसे, अॅड. श्री. लक्ष्मण पाटील श्री. आनंद पवार, श्री. युवराज जाधव, श्री. श्रीनीवास शेळके, सौ. लतीका देशमुख, सौ. सुरेखा पाटील, श्री. सुभाष घोडके, श्री शिवाजी देशमुख, प्रा. डॉ. बालाजी वाघमारे, श्री. अनिल पाटील, प्रा. सचिन सुर्यवंशी, श्री. बालाप्रसाद बिदादा, श्री सुधीर गोजमगुंडे, श्री. शिवाजी कांबळे, अजय शहा आनंद मालु, डॉ. सतिष कानडे, भालचंद्र पाटील, डॉ. हर्षवर्धन राऊत, ऍड उदय गवारे, वैभव तळेकर, भगवान माकणे, विक्रम माकणीकर, विजय औढे, डॉ. कदम, धनंजय शेळके, शहाजी पवार, बाजीराव शिंदे, मुकेश राजमाने, संभाजी सूळ, अशोक अग्रवाल अशोक लोया, राजकुमार पाटील, मुकेश जाधव, ज्योतीराम कदम, किसन मंदाडे, संजय माने, हरिभाऊ जाधव, राम स्वामी, बालाजी जाधव, रजाक शेख आदी उपस्थित होते.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, माजी सभापती ललितभाई शहा, राष्ट्रीय गुमास्ता मंडळ अध्यक्ष तुळशीराम गंभीरे यांनी मनोगत व्यक्त केले.शेवटी आभार सुभाष गंभीरे यांनी मानले.
अशीही सामाजिक बांधिलकी