महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्याध्यक्ष डॉ मनीषा शिंदे यांच्या बेकायदेशीर बदलीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने व तीव्र आंदोलनाचा इशारा
लातूर
महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटना मुख्यालय लातूर ही राज्यातील परिचारिका संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांची एकमेव शासनमान्यता प्राप्त संघटना असून, ती राज्यातील परिचारिकांच्या हितार्थ न्यायिक, सनदशीर मार्गाने कार्य करते. संदर्भ १ नुसार संघटनेनी प्रशासन व शासनस्तरावर गेल्या काही वर्षापासून अनेकवेळा, छ. शि. म. स रु. सोलापूर येथील मा. अधिसेविका यांच्या (ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे व छ शि म स रु सोलापूर येथील) मनमानी कारभाराबाबत, संघटनेनी लेखी व तोंडी कळवून त्याबाबत चौकशी करून, योग्य ती कार्यवाही करण्याबाबत विनंती केली होती.
त्याचबरोबर संघटनेच्या वेगवेगळ्या मागणी पत्रातून व विविध आंदोलनातून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्याकडून नाहक त्रास दिला जातो, तो थांबवण्यात यावा अशी विनंती केली होती. परंतु सोलापूर येथील प्रकरणात, मा. अधिसेविका यांच्या मनमानी व गलथान कारभाराची कसलीही चौकशी किंवा कार्यवाही न करता, आज संदर्भ २ अन्वये डॉ मनीषा शिंदे, पाठयनिर्देशिका, छ शि म स रु सोलापूर यांची प्रशासकीय बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आले असून ही बाब अत्यंत निंदनीय आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो. तसेच नोव्हेंबेर महिन्यात केलेली ही प्रशासकीय बदलीची कार्यवाही ही बदली कायदा व शासन निर्णयास धरून नाही.
यापूर्वी ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, मुख्यालय लातूर, संघटनेच्या माजी राज्याध्यक्ष आरीफा शेख यांची याच अधिसेविका यांनी केलेल्या खोट्या तक्रारीवरून आधी बदली व बेकायदेशीर निलंबन करण्यात आले होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर वारंवार होत असलेल्या बेकायदेशीर कार्यवाही पाहता, सदोष मनुष्यवधाचा गंभीर आरोप असलेल्या अधिसेविका यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे. ज्यामुळे त्यांच्या गलथान व मनमानी कारभारावर कसलेही निर्बंध घातले जात नाहीत. उलट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर निलंबन, बदली सारख्या बेकायदेशीर कार्यवाह्या केल्या जातात. यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे भविष्य धोक्यात असून संघटनेच्या अस्तित्व व हक्काचे हनन करण्याचा प्रयत्न होत आहे. यास्तव या कार्यवाहीचा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, मुख्यालय लातूर जाहीर निषेध व तीव्र विरोध करत आहे. तद्वतच आपणास नम्र निवेदन करण्यात येते की सदर आदेश रद्द करून संघटनेच्या राज्याध्यक्ष डॉ मनीषा शिंदे यांची बेकायदेशीर बदली रद्द करण्यात यावी. ही नम्र विनंती
अन्यथा दि.२६, २७, २८ नोव्हेंबर २०२२ काळी फीत आंदोलन, दि. २९ नोव्हेंबेर २०२२ रोजी पूर्णवेळ काम बंद आंदोलन व दि ३० नोव्हेंबेर २०२२ पासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन व निदर्शने करण्यात येईल. याचा रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होऊ शकतो व तसे झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. असे संघटनेच्या राज्यसरचिटणीस सुमित्रा तोटे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे परिचरिकांच्या द्वारसभेत निषेध व्यक्त करताना म्हणाल्या.
यावेळी संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष अरुण कदम, कोअर कमिटी सदस्य योगेश वाघ, शीला कांबळे, जिल्हाध्यक्ष छाया चव्हाण, उपाध्यक्ष संजीव लहाने, रेणुका रेड्डी, संघटक उणिता देशमाने, सहसचिव रमांजली माने सहखजिनदार बालिका सावंत, संभाजी केंद्रे, विवेक वागलगावे, सदस्य भगवान केंद्रे, मजहर शेख व संघटनेचे सर्व पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटना मुख्यालय लातूर ही राज्यातील परिचारिका संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांची एकमेव शासनमान्यता प्राप्त संघटना असून, ती राज्यातील परिचारिकांच्या हितार्थ न्यायिक, सनदशीर मार्गाने कार्य करते. संदर्भ १ नुसार संघटनेनी प्रशासन व शासनस्तरावर गेल्या काही वर्षापासून अनेकवेळा, छ. शि. म. स रु. सोलापूर येथील मा. अधिसेविका यांच्या (ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे व छ शि म स रु सोलापूर येथील) मनमानी कारभाराबाबत, संघटनेनी लेखी व तोंडी कळवून त्याबाबत चौकशी करून, योग्य ती कार्यवाही करण्याबाबत विनंती केली होती. त्याचबरोबर संघटनेच्या वेगवेगळ्या मागणी पत्रातून व विविध आंदोलनातून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्याकडून नाहक त्रास दिला जातो, तो थांबवण्यात यावा अशी विनंती केली होती. परंतु सोलापूर येथील प्रकरणात, मा. अधिसेविका यांच्या मनमानी व गलथान कारभाराची कसलीही चौकशी किंवा कार्यवाही न करता, आज संदर्भ २ अन्वये डॉ मनीषा शिंदे, पाठयनिर्देशिका, छ शि म स रु सोलापूर यांची प्रशासकीय बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आले असून ही बाब अत्यंत निंदनीय आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो. तसेच नोव्हेंबेर महिन्यात केलेली ही प्रशासकीय बदलीची कार्यवाही ही बदली कायदा व शासन निर्णयास धरून नाही.
यापूर्वी ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, मुख्यालय लातूर, संघटनेच्या माजी राज्याध्यक्ष आरीफा शेख यांची याच अधिसेविका यांनी केलेल्या खोट्या तक्रारीवरून आधी बदली व बेकायदेशीर निलंबन करण्यात आले होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर वारंवार होत असलेल्या बेकायदेशीर कार्यवाही पाहता, सदोष मनुष्यवधाचा गंभीर आरोप असलेल्या अधिसेविका यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे. ज्यामुळे त्यांच्या गलथान व मनमानी कारभारावर कसलेही निर्बंध घातले जात नाहीत. उलट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर निलंबन, बदली सारख्या बेकायदेशीर कार्यवाह्या केल्या जातात. यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे भविष्य धोक्यात असून संघटनेच्या अस्तित्व व हक्काचे हनन करण्याचा प्रयत्न होत आहे. यास्तव या कार्यवाहीचा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, मुख्यालय लातूर जाहीर निषेध व तीव्र विरोध करत आहे. तद्वतच आपणास नम्र निवेदन करण्यात येते की सदर आदेश रद्द करून संघटनेच्या राज्याध्यक्ष डॉ मनीषा शिंदे यांची बेकायदेशीर बदली रद्द करण्यात यावी. ही नम्र विनंती
अन्यथा दि.२६, २७, २८ नोव्हेंबर २०२२ काळी फीत आंदोलन, दि. २९ नोव्हेंबेर २०२२ रोजी पूर्णवेळ काम बंद आंदोलन व दि ३० नोव्हेंबेर २०२२ पासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन व निदर्शने करण्यात येईल. याचा रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होऊ शकतो व तसे झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. असे संघटनेच्या राज्यसरचिटणीस सुमित्रा तोटे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे परिचरिकांच्या द्वारसभेत निषेध व्यक्त करताना म्हणाल्या. यावेळी संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष अरुण कदम, कोअर कमिटी सदस्य योगेश वाघ, शीला कांबळे, जिल्हाध्यक्ष छाया चव्हाण, उपाध्यक्ष संजीव लहाने, रेणुका रेड्डी, संघटक उणिता देशमाने, सहसचिव रमांजली माने सहखजिनदार बालिका सावंत, संभाजी केंद्रे, विवेक वागलगावे, सदस्य भगवान केंद्रे, मजहर शेख व संघटनेचे सर्व पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित होते.