28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeठळक बातम्या*बटकणंगले सरपंचपदासाठी धोंडीबा कुंभार यांना एकमताने संधी*

*बटकणंगले सरपंचपदासाठी धोंडीबा कुंभार यांना एकमताने संधी*

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथील सर्व श्रमिक संघाचे पदाधिकारी व कामगारांचे नेते धोंडीबा कुंभार यांना बटकणंगले गावच्या सरपंचपदासाठी एकमताने संधी देण्यात आली.तसेच
गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व राजकीय पक्ष व गट एकत्र आल्यामुळे बटकणंगले ग्रामपंचायतीची पंचवार्षिक
निवडणूक बिनविरोध करण्यात आली. १० जागांसाठी दहाच अर्ज दाखल झाल्याने सदर निवडणूक बिनविरोध झाली.इतर प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदी धोंडीबा कुंभार यांना एकमताने संधी देण्यात आली.तसेच
राष्ट्रवादी व भाजपाला प्रत्येकी अडीच वर्ष उपसरपंचपद देण्याचा निर्णय घेण्यात आला.

बटकणंगले ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध व्हावी , यासाठी सुरुवातीपासूनच सर्व राजकीय पक्ष व गटांनी जोरदार प्रयत्न सुरु ठेवले होते.अखेर सर्वांचे एकमत होऊन १० जागांसाठी दहाच अर्ज दाखल झाल्याने सदर निवडणूक बिनविरोध झाली.इतर प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदी धोंडीबा कुंभार यांना एकमताने संधी देण्यात आली.तसेच राष्ट्रवादी व भाजपाला प्रत्येकी अडीच वर्ष उपसरपंचपद देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून विलास पाटील, मीना राजेंद्र शिंदे, मनिषा मनोहर पाटील, संजय पाटील, कविता दीपक मटकर, कविता विशाल सुतार, रवींद्र मारूती पाटील, कविता सागर मुरुकठे, प्रकाश गंगाराम पाटील यांना संधी देण्यात आली.
दरम्यान , बिनविरोध सरपंच झालेले धोंडीबा कुंभार यांनी बटकणंगले गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्यरत राहू आणि विकासकामातून सर्वांचा विश्वास सार्थ ठरवू ,अशी ग्वाही पञकारांशी बोलताना दिली.
कष्टक-यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी शहरात धोंडीबा कुंभार यांनी सर्व श्रमिक संघाच्या माध्यमातून वंचित , उपेक्षित घटकांबरोबरच सर्व क्षेञातील कामगार वर्गाला न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु ठेवला आहे.याशिवाय अभ्यासपूर्ण लेखन , वक्तृत्व यातून देखील समाज प्रबोधन करत निकोप समाजननिर्मितीच्या कार्यात त्यांचे विशेष योगदान राहिले आहे.त्यामुळे समाज विकास कार्यासाठी निरपेक्ष भावनेने धडपड करणा-या धोंडीबा कुंभार यांना बटकणंगले ग्रामस्थांनी गावच्या सरपंचपदासाठी एकमताने संधी देऊन त्यांच्या निरपेक्ष समाजकार्याचा उचित गौरव केला असल्याची भावना कामगार वर्गासह सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यावेळी सर्व राजकीय पक्षांचे नेते , पदाधिकारी , कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]