फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातुन बांबू व मिलेट मधील आंतरराष्ट्रीय संशोधनाचा फायदा मराठवाड्याला होणार – पाशा पटेल
लातूर ;( वृत्तसेवा ):-जगभरात बांबू व मिलेट मधील आंतरराष्ट्रीय संशोधनाचा सखोल अभ्यास करुन त्याचा फायदा मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना व्हावा या उद्देशाने फिनिक्स फाउंडेशन लोदगा (जि. लातुर )येथे या विषयातील तज्ञ मंडळी समवेत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्राला पाशा पटेल, अध्यक्ष राज्य कृषी मुल्य आयोग, नंदकुमार, महासंचालक मनरेगा मिशन महाराष्ट्र राज्य, डॉ.विजय खोले माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ, प्रा.डॉ.संजय देशमुख माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ., डॉ.एम जे खान अध्यक्ष ऍग्रीकल्चर टुडे नवी दिल्ली, डॉ मोहम्मद उस्मान,जेष्ठ कृषी शास्त्रज्ञ, डॉ. एस ए हुसेन, प्रमुख शास्त्रज्ञ केंद्रीय कोरडवाहू शेती अनुसंधान केंद्र हैदराबाद, श्रेयसी अग्रवाल,मुल्य साखळी तज्ञ चेन्नई, एम व्यंकटराव एन व्ही अॅग्रोटेक प्रा. लि. हैदराबाद, क्रुणाल नेगांधी, कार्यकारी संचालक ज्युरियन कन्सल्टन्सी मुंबई, मोहन होडावडेकर, अध्यक्ष जनशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग, संजीव कर्पे, आंतरराष्ट्रीय बांबू तज्ञ, अलिशा चंद्रन पर्यावरण संशोधन अभ्यासक IIT, मुंबई तथा फिनिक्स फाउंडेशनचे समन्वयक परवेज पाशा पटेल व निवडक प्रगतीशील शेतकरी वर्ग उपस्थित होते.
जगभरात व देशांतर्गत या विषयावर होत असलेल्या संशोधनाचा उपयोग मराठवाड्यातील कोरडवाहु शेतीमधे उपयुक्तरित्या करता यावा व या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मीती व्हावी या करीता संशोधन करुन रोजगारभिमुख व्यवस्था निर्माण करुन याचा उपयोग मराठवाड्यातील शेतकरी वर्गाला कसा करता यईल यावर या चर्चा सत्रात सविस्तर विचार मंथन करण्यात आले. व या संशोधनाचा लाभ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना करुन उपलब्ध करुन देण्यासाठी फिनिक्स फाउंडेशन लोदगा च्या माध्यमातुन या विषया वर संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण याची सांगड घालुन याचा सविस्तर प्रकल्प आराखाडा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉ. संजय देशमुख यांच्या कडे सोपविण्याचे ठरले.
व तसेच ईलेक्ट्रिक चर्गिंगवर चालनारे मिनी ट्रक्टरचे प्रात्याक्षिक व लोकार्पण या वेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर- घुगे यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. सामान्य शेतकरी वर्गाला इंधनावरील खर्च कमी करुन आंतर मशागती करीता हे मिनी ट्रक्टर शेतकरी याना उपयुक्त ठरणार असुन, या मध्ये विविध प्रकारच्या शेती उपयोगी सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या लोकाभिमुख उपक्रमास महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर- घुगे यांनी सांगितले.