फार्माकॉन-२०२४ या आंतरराष्ट्रीय परिषदचे दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी येथे समारोप
लातूर: दयानंद शिक्षण संस्था द्वारा संचालित दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. ही परिषद महाविद्यालयाच्या इंस्टीट्यूशन इनोवेशन सेल व इंटर्नल क्वालिटी अशुरन्स सेल विभागामार्फत फार्माकॉन-२०२४ ” रिसेन्ट ट्रेंड्स इन ड्रग डिस्कवरी अँड डेव्हलपमेंट ” ह्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आज दि. ३ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचा समारोप संपन्न झाला.आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एस.सी. ढवळे (इंचार्ज रजिस्ट्रार स्वा.रा.ती.म.वि.नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना म्हणाले आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मार्गदर्शनातून निश्चितच उपस्थित विद्यार्थ्याना व संशोधकांना फार्मसी क्षेत्रातील अद्ययावत द्यान मिळाले. महाविद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले.
फार्माकॉन-२०२४ ही परिषद जगभरातील सर्व फार्मसी विषयतज्ञ्, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी होती. या परिषेदे करिता भारतातील महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश ई. विविध राज्यातून व यु.एस.ए., ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, नायजेरिया, कझाकस्तान ई. परदेशातून फार्मातज्ञ्,विद्यार्थी व संशोधक उपस्थित होते. ह्या परिषदेमध्ये ७२२ हुन अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक उपस्थित होते.. वेगवेगळ्या देशांतील विविध तज्ज्ञ संशोधक मान्यवरांकडून औषधनिर्माण क्षेत्रातील नवीन शोध समजून घेणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.
आज परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. विष्णू एन.ठाकरे (संचालक स्किट्सला मुंबई), अमित पाटील (डेटा विश्लेषक,हैदराबाद), डॉ. सी.एस. कदम (अलेम्बिक फार्मा, हैदराबाद) या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संशोधक मान्यवरांनी औषधनिर्माण क्षेत्रातील येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्याना अवगत केले.
फार्माकॉन-२०२४ अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेमध्ये एकूण ११९ महाविद्यालयातून विद्यार्थी सहभागी झाले होते. २६२ शोध प्रकल्पांपैकी सर्वोत्तम प्रकल्पांना मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक विभागातून प्रथम ५०००/-रु, द्वितीय ३०००/-रु,तृतीय २०००/-रु पुरस्कार,मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. एम.फार्म-गटातून प्रथम ऋतिक गुप्ता, द्वितीय प्रगती जाधव, तृतीय अब्रार सिद्दीकी, प्रोत्साहन पुरस्कार चवाळके प्राजक्ता व मुरकुटे ज्योती, बी.फार्म-गटातून प्रथम कुलकर्णी शिवम, मयूर पाटील,द्वितीय नम्रता लाडे,डॉ.सी.व्ही.पांचाळ, तृतीय सूर्यवंशी रेश्मा,शिंदे वैष्णवी डी.फार्म-गटातून प्रथम अनुजा भावसार आणि भोसले गायत्री , द्वितीय गणेश डहाळे, तृतीय मयुरी सूर्यवंशी,प्राची मेंगशेट्टी यांची निवड केली.
समारोप समारंभाचे आभार प्रा.सज्जाउद्दीन सय्यद यांनी व्यक्त केले. फार्माकॉन-२०२४ ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा, सदस्य विशाल लाहोटी , सदस्य विशाल अग्रवाल,सदस्य सागर मंत्री ,प्राचार्य डॉ. क्रांती सातपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विभागप्रमुख, सर्व कमिट्यांचे चेअरमन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीपणे पार पडली.