28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमनोरंजनप्रेमाची अनोखी केमिस्ट्री-वन फोर थ्री

प्रेमाची अनोखी केमिस्ट्री-वन फोर थ्री

लातूर

प्रेमाची अनोखी केमिस्ट्री वन फोर थ्री चित्रपटातून ४ मार्चला झळकणार मोठ्या पडद्यावरदिग्दर्शक-अभिनेता योगेश भोसलेंची पत्रपरिषदेत माहितीलातूर,दि.२५ःरोमँटिक चित्रपटांच्या चलतीमध्ये वन फोर थ्री चित्रपटली पुढे सरसावत असून, प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेवून येत शारदा फिल्म प्रॉडक्शन निर्मित आणि विरकुमार शहा निर्मित वन फोर थ्री हा प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि खर्‍याखुर्‍या जीवनावर आधारित,दाक्षिणात्य चित्रपटाच्या धाटणीचा हा मराठीतील पहिला-वाहिला एक नवा चित्रपट येत्या दि.४ मार्च २०२२ राज्यातल्या अनेक चित्रपटगृहातून झळकणार आहे,असे सांगून याचा प्रेक्षकांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन दिग्दर्शक योगेेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

पे्रमाचे विविध रंग मांडत य चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे, चित्रपटाच्या पोस्टरवर मी दिग्दर्शक,अभिनेता योगेश आणि अभिनेत्री शितल अहिरराव यांची केमिस्ट्री पहायला मिळत आहे. तर अभिनेता वृषभ शहाचा खलनायकी जबरा असा रुप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.या चित्रपटात सुरेश विश्‍वकर्मा आणि शशांक शेंडे यांनी देखिल भूमिका साकारली आहे.या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन पी.शंकरन यांनी केले असून, लखन चौधरी यांचे गाण्याचे बोल आहेत.  आर्या अंबेकर हिने भरली मना मध्ये हे गाणे गायिले आहे.वाचू दे इष्काचा प्राण ही कव्वाली प्रमोद त्रिपाठी यांनी गायली आहे, आयटम सॉंग पडला पडदा  हे रेषमा सोनावणे हिने शब्दबध्द केलेय, आनंद शिंदे यांनी धिंगाणा पार्टी सॉंग गायले आहे.आर.कलाई कुमार यांनी नृत्य दिग्दर्शन केलेय, विकास सिंग यांनी उत्तम चित्रीकरण केले असून, हे आपलं काळीज हाय या वन फोर थ्री चित्रपटाच्या टॅगलाईनने आधिच धुमाकुळ घातला असताना हा चित्रपट नवे काय घेवून येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.वन फोर थ्री या चित्रपटाची कथा वास्तव जीवनावर आधारित असून यात एकमेकांवर जीव जडलेल्या प्रेयसी आणि प्रियकाराची कथा पहायला मिळणार आहे, या चित्रपटाच्या टिझरने, गाण्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे,यात शंका नाही, तेव्हा येत्या ४ मार्चला आपण सर्वांन तो पहावा असे असे योगेश भोसले याने आवाहन केले.या पत्रकार परिषदेला अभिनेत्री शितल अहिरराव, खलनायक वृषभ शहा, अनिता पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]