लातूर (प्रतिनिधी) :
लातूर येथील प्रसिद्ध आर सी.सी. क्लासेसचे संचालक शिक्षण तज्ञ् प्रा. शिवराज मोटेगावकर , लक्ष्मिंमिकांतपांढरे यांनी अत्यंत प्रतीकुल परीस्थित एम एस. इन सॉफ्टवेर इंजिनेरींग शिक्षण घेऊन खूप मोठे यश संपादन केले आहे , घरची परिस्थिती सर्व साधारण असताना त्याने अनेक समस्यांचा ,संकटांचा सामना करून वडिलांचे निधन झालेले असून सुद्दा सर्व कुटुंबियांना सोबत घेऊन त्यांच्या मामाच्या व मित्राच्या सहकार्याने त्यांनी खूप मोठे यश संपादन केले आहे त्याच बरोबर .लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे यांनी कमीत कमी वयामध्ये पी.एच.डी संपादन करून महाविद्यालयातील निकाल १००% लावून विध्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ची संधी आणून दिली ,त्याबद्दल मॅडम चे कौतुक केले . अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले . लातूर येथे श्री खांडेकर फोटो स्टोडिओ व ढगे क्लासेस यांच्या संयुक्त विध्यमानाने श्री लक्ष्मीकांत भास्कर पांढरे व प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे (जेवळे)यांचा सत्कार करण्यात आला . हा गुणगौरव सोहळा करण्यामागचा हेतू कि ,श्री लक्ष्मीकांत भास्कर पांढरे यांनी अमेरिका येथील एम एस. इन सॉफ्टवेर इंजिनेरींग हि पदवी प्राप्त करून मोठे यश संपादन केले आणि लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे यांनी महाविद्यालयात विध्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट घेण्यासाठी, महाविद्यालयाचा १०० %निकाल, महाविद्यालयाचा सर्वांगिण विकास अशाच शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान व राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल लातूर येथिल प्रसिद्ध आर सी.सी. क्लासेस चे संचालक शिक्षण तज्ञ् मा. श्री शिवराज मोटेगावकर यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नरहरे क्लासेस चे संचालक श्री नरहरे सतीश ,लातूर येथील आर सी.सी. क्लासेस चे संचालक शिक्षण तज्ञ् मा. श्रीशिवराज मोटेगावकर , ढगे क्लासेस चे संचालक श्री सचिदानंद ढगे, श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे, मंचावर उपस्थित होते . या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती मातेच्या मूर्तीचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला . या कर्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषण श्री खांडेकर यांनी केले त्यामध्ये श्री शिवराज मोठेगावकर , श्री शिवलिंग जेवळे , सतीश नरहरे यांच्या बदल माहिती सांगितले. तर लक्ष्मीकांत पांढरे हा अत्यंत होतकरू आणि कष्ट करणारा विध्यार्थी आहे तो माझ्या क्लासेस मध्ये असताना खूपच मेहनती होता, श्री लक्ष्मीकांत भास्कर पांढरे यशस्वी होण्या मागे यांच्या आई चे खूप मोठे योगदान आहे त्यांचे वडील लक्ष्मीकांत पांढरे हे आठ वर्षाचे असताना त्याचे निधन झाले तेव्हा पासून न खचता राजमाता जिजाऊ प्रमाणे त्यांना शिक्षण दिले म्हणून हे यश संपादन करण्यास यशस्वी ठरले असे प्रतिपादन नरहरे क्लासेस चे संचालक श्री नरहरे सतीश यांनी केले . या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीपानकोरेआणि आभारप्रदर्शन श्री बिराजदार चंद्रकांत यांनी केले.