लातूर :
शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल
आंतरराष्ट्रीय शिक्षण व व्यवस्थापन संस्था नवी दिल्ली (International Institute of Education and Manegment New Delhi) च्या वतीने दिला जाणारा आशिया प्रशांत आंतरराष्ट्रीय शिक्षा उत्कृष्टता पुरस्कार -२०२३ ( Asia Pacific Education Excellence Award”) देऊन दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री पी.व्ही. कुलकर्णी सर यांना मा.श्री.सुमन सिंग (कामगार व रोजगार मंत्री भारत सरकार) यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे सन्मानीत करण्यात आले.
दयानंद शिक्षण संस्था लातूरच्या रसायन शास्त्राचे जेष्ठ प्राध्यापक श्री पी.व्ही.कुलकर्णी सर हे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून प्रसिध्द आहेत. तसेच अभियांत्रिकी विद्यार्थ्यासाठी समर्पित असणा-या श्री जानाई प्रतिष्ठान संस्थेचे सर संस्थापक आहेत.
आशिया प्रशांत अंततर्गत ४८ देश येतात या मधुन सरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणा-यांसाठीचा आशिया प्रशांत आंतरराष्ट्रीय शिक्षा उत्कृष्टता पुरस्कार हा मानाचा पुरस्कार समजला जातो.
या पुरस्कारा बद्दल सरांचे हजारो विद्यार्थी व त्यांचा मित्र परिवार आनंद व्यक्त करत आहेत.
पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री लक्ष्मीरमन लाहोटी, सचिव श्री.रमेश बियानी, श्री सुरेश जैन, प्राचार्य डाॅ.दरगड यांनी अभिनंदन केले आहे.