लातूर/प्रतिनिधी
अणदूर येथील रहिवाशी व सध्या लातूर येथे प्रसिद्ध किडनी तज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रमोद घुगे यांची लातूर येथील आयकॉन हॉस्पिटल येथे भेट घेतली. आमचे मित्र मोहोळ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्फत डॉ. प्रमोद घुगे यांची भेट घेण्याचा योग आला. मी पहिल्यांदाच भेटत होतो डॉ. प्रमोद यांची आयकॉन हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेतली तेव्हा मन भरून आलं. अगदी प्रेमानी व आदरानी संभाषण करीत आपला अनमोल वेळ आमच्यासाठी दिला.

आयकॉन हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक गोरगरीब व गरजवंत कुटुंबांना शासकिय योजनेचा लाभ मिळवून देत कित्येक गोरगरीब रुग्णांना आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जीवनदान दिलेले आहे. भविष्यात लातूर सह परिसरातील सर्वच रुग्णांची सोय व्हावी हा उद्देश बाळगून भव्य अशा हॉस्पिटलची उभारणीही लवकरच होत असुन सर्वच आजार व रोगावरील ईलाज या हॉस्पिटल मध्ये केले जातील. जेणे करून रुग्णांना याचा निश्चितच फायदा होईल. डॉ. प्रमोद घुगे हे सामाजिक बांधिलकी जपत जी वैद्यकीय सेवा सर्व सामान्यांना देतात ती खरोखरच लक्षवेधी आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेचा आलेख दिवसेंदिवस असाच बहरत राहणार यात तिळमात्र शंका नाही. परंतु त्यांच्या सेवेमुळे ज्यांना आपली दुकाने बंद पडतील की काय….?? अशी भिती वाटते आणि ज्या काहींच्या पोटात डॉक्टरांच्या सेवेने दुखते ते भविष्यात भुतकाळाप्रमाणेच कुठल्याही स्तराला जाऊन आणखीनच डॉ.घुगे यांना त्रासच कसा देता येईल हे बघणार की, नाही खरोखरच डॉ.घुगे लातुरच्या वैद्यकीय क्षेत्रातील कोहिनुर हिरा हे समजून घेऊन डॉक्टरांच्या सेवेचे कौतुक करतील हे येणारा काळच सांगेल असे पत्रकार दिनेश ईटकर यांनी आपली भावना व्यक्त सांगितले……!
