*प्रशांत पाटील तहसीलदार*

0
316

निलंगा तालुक्यातील मुगाव येथील प्रशांत व्यंकटराव पाटील यांची मुदखेडच्या मुख्याधिकारी पदोन्नतीवरून तहसीलदार म्हणून नियुक्ती..

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-निलंगा तालुक्यातील मुगाव येथील सुपूञ प्रशांत व्यंकटराव पाटील हे सर्वसामान्य शेतकर्‍यांचा मुलगा परिक्षेच्या जोरावर तहसीलदार पदापर्यंत मजल मारणारा व्यक्ती ठरला आहे.त्यांच्या अनेक कौतुकास्पद कामगिरीनुसार त्यांची पदोन्नती झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले असून यामध्ये तहसीलदार पदावर निवड झालेले मुदखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्यंकटराव पाटील यांचा समावेश आहे.त्यामुळे मुदखेडचे मुख्याधिकारी प्रशांत व्यंकटराव पाटील यांचा समावेश आहे.त्यामुळे मुदखेडचे मुख्याधिकारी प्रशांत व्यांकटराव पाटील यांची तहसीलदार पदावर दि.17 जानेवारी 2022 रोजी रूजू होणार आहेत.मुख्याधिकारी पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर जनसामान्यांचे प्रश्न अतिशय सहानुभूतीने सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे कमी कालावधीतच ते लोकप्रिय झाले.नंदीनगर रहिवाशांचे उपोषण तसेच उमरी रोड येथील डाॅ.शंकररावजी चव्हाण व्यापारी संकुलाचा विषय अतिशय चाणाक्षपणे त्यांनी हाताळला.पाणीपुरवठा योजना,रेल्वे,अंडरब्रीज,तालुका क्रीडा संकुल इत्यादी महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यात त्यांनी कसब दाखविले आहे.
मुख्याधिकारी प्रशांत व्यंकटराव पाटील यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यासाठी काही दिवस उरले आहेत परंतु त्यांना नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची तहसीलदार म्हणून निवड झाली आहे.त्यांच्या निवडीबद्दल मुदखेड शहरातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.त्याचप्रमाणे निलंगा तालुक्यातील मुगाव येथील प्रशांत व्यंकटराव पाटील यांनी मुख्याधिकारी ते तहसीलदारपर्यंत मजल मारल्याने आपल्या युवक संघर्ष क्रांती मुगाव या गुृृपवर आणि परिसरातील गावांनी पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here