18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडीप्रयाग अक्का कराड जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

प्रयाग अक्का कराड जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

पंच मातांचा सत्कार म्हणजे सत्यम शिवम सुंदरम
माजी केद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मतः
पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार प्रदान

लातूर ,२७ मेः “आज पंच कन्यांचा नाही तर पंच मातांचा सत्कार होतांना आनंद होत आहे. ज्ञान हे सर्वात महत्वाचे असून ते सत्यम शिवम सुंदर असते. या मातांनी आपल्या कार्यातून हे ज्ञान दाखवून दिले आहे. तसेच संपूर्ण जगात एकोपाचा संदेश देण्यासाठी रामेश्वर हे गावाचा आदर्श जगात पोहचविणे गरजेचे आहे.”असे मत लोकसभेचे माजी सभापती व माजी केद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी मांडले.


विश्वशांती केंद्र (आळंदी),माईर्स एमआयटी, पुणेतर्फे रामेश्वर (रुई) येथे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या नवव्या पुण्यस्मरण स्मृतिदिनाचे औचित्य साधून, शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्माचा समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून, समाजासमोर  आदर्श निर्माण करणार्या पंचकन्यामध्ये, संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक व पुणे येथील पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा माता कृष्णा कश्यप, ज्येष्ठ समाजसेविका व थोर तपस्विनी शशिकला भिकाजी केंद्रे,  सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व ज्येष्ठ समाजसेविका डॉ. तेजस्विनी जनार्दन वाडेकर,  निवृत्त प्राचार्यां व आपुलकी या संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. ललिता शरद (नानासाहेब) गुप्ते आणि ज्येष्ठ समाजसेविका लक्ष्मीबाई महादु शेळके यांना पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. २१,०००/- (रुपये एकवीस हजार) प्रदान करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चाकूरकर बोलत होते.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.


या वेळी ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक आमदार रमेशअप्पा कराड, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, कमल राजेखाँ पटेल, डॉ. हनुमंत कराड, , ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर व राजेश कराड हे उपस्थित होते.
शिवराज पाटील-चाकूरकरम्हणाले, “देशात ज्या प्रकारे चांगल्या गोष्टी आहेत तसेच वाईट पण आहेत. सध्या हा देश जाती आणि धर्माच्या बंधनात अधिक अडकलेला दिसतो. मानवाला सुखी जीवन जगायचे असेल तर देशात चांगली परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे.


माझ्या ४८ वर्षाच्या राजकारणाच्या प्रवासात जगातील सर्व धार्मिक स्थळांना भेट दिली. त्यामध्ये रामेश्वर येथील राम मंदिरातील मूर्त्यां या सर्वात सौदर्यवान आहेत. सौदर्य काय असते हे मूर्त्यांच्या डोळ्यात पाहिल्यावर कळते. सौदर्य हा सत्याचा भाग आहे. जेथे सत्य प्रकट होते तेथेच मनामध्ये पवित्र भावना निर्माण होते. ही भावना धार्मिक स्थळांवर गेल्यावर कळते.
डॉ. विश्वनाथ कराड यांनी त्यांच्या गावी हिंदू मुस्लिमांचा नाही तर वैचारिक पूल निर्माण करून एकतेचे मोठे कार्य केले आहे. कोणी ही असो त्याला धर्माची भावना मोठी असते परंतू चांगुलपणा एकट्यामुळे नाही तर घरातील सर्व सदस्यांमुळे येत असतो.”


प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “अक्कांची आठवण ही हदय स्पर्शी आहे. त्या शक्तीच्या स्त्रोत आहेत. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मुर्तीमंत प्रतिक त्यागमूर्ती अक्का आहेत. ईश्वर ही व्यक्ती नाही तर शक्ती आहे. आज संपूर्ण जगात आळंदीतून विश्व शांतीचा संदेश पोहचत असतांना रामेश्वर हे गाव मागे नाही. येथे मानव एकतेचा मोठे प्रतिक निर्माण केले गेले आहे. हे गाव ज्ञान यज्ञ भूमी होते याचे काही पुरावे सापडले आहेत. आता अक्कांच्या नावाने दिला जाणारा पंच कन्या पुरस्कार आता सप्त कन्याने होणार आहे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड यांच्या स्मृति प्रित्यार्थ या कार्यक्रमाचे आयोजन होतांना अतिशय समाधानाचे भाव अनुभवतो. त्यांच्याकडे पाहुनच देशातील राजकारणातील गढुळपणा काढून स्वच्छता कशी आणावी या साठी कार्य सुरू आहे.”
 डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, “शिक्षणाच्या माध्यमातून जगभर झेंडा फडकविणारे डॉ. विश्वनाथ कराड यांनी अक्कांच्या प्रेरणेतूनच हे सर्व कार्य केले आहे. आमच्या एकत्रित कुटुंबात अक्का ही मायाचा झरा होती. अन्नपूर्णा अक्कांनी जो त्याग केला आहे.त्यामुळेच त्यांना त्यागमूर्ती असे संबोधितले जाते.”
रमेशअप्पा कराड म्हणाले,“कोविडच्या काळामुळे दोन वर्ष हा पुरस्कार देता आला नाही. याची खंत वाटते. बहिण भावाचे नाते काय असते हे अक्का आणि अण्णाभाऊंकडे पाहून कळते. अक्कांच्या आर्शीवादाने डॉ. विश्वनाथ कराड यांनी शिक्षण संस्था उभी केली. तसेच भारतीय संस्कृती, अध्यात्मिक व सामाजिक कार्य अविरत सुरू आहे. एकत्रित कराड परिवाराचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा असे कार्य अक्कांनी केले आहे.”
सर्व पुरस्कार्थीयांनी आपले मनोगत व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. हनुमंत कराड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]