सर्वञ अभिनंदनाचा वर्षाव
निलंगा,-( प्रतिनिधी )-निलंगा तालुक्यातील निटूर येथील रहीवाशी असलेला कु.प्रणव प्रशांत साळुंके शिक्षणासाठी तो शिवभूमि विद्यालय यमुनानगर निगडी,पुणे याठिकाणच्या विद्यालयात धडे घेऊन शिक्षणाच्या माहेरघरात उच्चांक 10 वी बोर्ड परीक्षेत 81.20 टक्के घेऊन उत्तीर्ण झाला आहे त्याचे विविध स्तरातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
कु.प्रणव प्रशांत साळुंके यांच्याशी संवाद साधताना म्हणाला, मी पहाटे उढून दहावीच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास मी केल्याने उत्तीर्ण झाल्याचे सांगितले,तसेच माझ्या वडीलांच्या-आईंच्या मार्गदर्शनामुळे हा आजचा दिवस माझ्यासाठी प्रेरणादायीच म्हणावे लागेल पुढील शिक्षणासाठी माझी वाटचाल मोकळी झाल्याने प्रथम मी साळुंके परिवारातील सदस्य असल्याने येणार्या काळात माझ्या शिक्षणासाठी मी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर साळुंके परिवाराचे नावलौकिक करेन असेही त्यांनी संवादा दरम्यान खंत व्यक्त केली.

या दहावीच्या बोर्ड परिक्षेत पास झाल्याने त्याचे अभिनंदन जि.प.प्रशाला,मुगाव शाळेचे माजी मुख्याध्यापक रघुनाथराव साळुंके,माजी केंद्रप्रमुख सुखवास साळुंके,अशोक साळुंके,दशरथ साळुंके,शामसुंदर साळुंके,सतिश साळुंके,सुनिल साळुंके,बालाजी साळुंके,सौ.सुषमा प्रशांत साळुंके आदींनी केले आहे.