लातूर: जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा बजावल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ जाहीर केले आहे.
महाराष्ट्रातील 1278 पोलिसांना हे पदक जाहीर झाले असून, यामध्ये पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप जमादार यांचा समावेश असून राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी ही यादी जाहीर केली आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना या अगोदर त्यांच्या सेवेच्या गौरवार्थ पुढील प्रमाणे पदके देऊन गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील 1278 पोलिसांना हे पदक जाहीर झाले असून, यामध्ये पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप जमादार यांचा समावेश असून राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी ही यादी जाहीर केली आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना या अगोदर त्यांच्या सेवेच्या गौरवार्थ पुढील प्रमाणे पदके देऊन गौरविण्यात आले आहे.
राष्ट्रपती महोदय यांचे शौर्य पदक, पोलीस महासंचालकांचे पोलीस पदक, विशेष सेवा पदक. तर अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांना याआधी विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. गडचिरोली येथे नक्षलविरोधी अभियानामध्ये कार्यरत असताना सोमय मुंडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मरदीन टोला परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षापासून नक्षली चळवळीत सक्रिय असलेला मोस्टवॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याला देखील ठार केले आहे. त्यावेळी गडचिरोली येथे नक्षलवाद्याविरुद्ध राबविण्यात आलेल्या ऑपरेशनचे नेतृत्व सध्याचे लातूर जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अत्यंत यशस्वी पणे पार पाडले होते. तब्बल नऊ तास नक्षलवाद्यांशी झुंज देत ही मोहीम फत्ते करून दाखवली होती. विशेष म्हणजे यामध्ये एकही जवान जखमी अथवा शहीद झाला नव्हता. सोमय मुंडे यांनी नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना आतापर्यंत चार पदके मिळाली आहेत. सोमय मुंडे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी आयआयटी आणि एमटेक ही पदवी संपादन केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाची 2016 ची परीक्षा पास होऊन ते आयपीएस अधिकारी झाले आहेत. सोमय मुंडे यांची पहिली पोस्टिंग औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणी त्यानंतर ए.एस.पी.अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे व नंतर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे अपर पोलीस अधीक्षक(नक्षल विरोधी विरोधी अभियान) म्हणून कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी अनेक धाडसी कारवाया केल्या असून मार्च 2021 मध्ये छत्तीसगड परिसरातील अंबुजमाळा येथे नक्षली परिसरात जाऊन त्यांचा अड्डा उध्वस्त करत एन्काऊंटर कारवाई करून मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला होता. तर जून 2021 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील आटापल्ली येथे धाडसी कारवाई करत 13 नक्षलीना कंठस्नान घातले होते. तसेच लातूर जिल्ह्याचे सध्याचे ऑफर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनाही आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले असून गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आमगाव उपविभागात विशेष कार्य केले आहे.
डॉ. अजय देवरे हे नाशिक येथील राहणारे असून सन 2010 मध्ये पोलीस उपाधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले. प्रशिक्षणानंतर सांगली येथे प्रोबेशनरी उपाधीक्षक म्हणून म्हणून कार्य केल्यानंतर नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून विशेष कर्तव्य पार पाडले. त्यानंतर संगमनेर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी व नाशिक शहर येथे सहाय्यक पोलीस आयुक्त, त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्य पार पाडले आहेत. नक्षलग्रस्त आमगाव उप विभागामध्ये कार्यरत असताना नक्षली भागात विविध उपायोजना करणे, नक्षल विरोधी अभियानामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणे, कसल्याही धोक्याची परवा न करता कर्तव्य पार पाडणे या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने डॉ.अजय देवरे यांना अंतरिक्ष सुरक्षा सेवा पदक जाहीर केले आहे.
तसेच सध्या लातूर जिल्हा महामार्ग पथकामध्ये प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप जमादार यांनाही अंतरिक्ष सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले असून त्यांनी 2017 ते 20 पर्यंत नक्षल प्रभावित गोंदिया जिल्ह्यात सेवा बजावली आहे.नक्षली परिसरात पेट्रोलिंग, विविध उपाय योजना आणि सुरक्षेसाठी जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बजावली. पोलिस उपनिरीक्षक संदीप जमादार हे मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका येथील रहिवासी आहेत. 2015 मध्ये ते पोलिस दलात दाखल झाले. उपनिरीक्षक पदाचे ट्रेनिंग आटोपल्यावर त्यांची पहिली पोस्टिंग देगलूर येथे व दुसरी पोस्टिंग नक्षल प्रभावित गोंदिया जिल्ह्यात झाली. 2017 ते 2020 असे तीन वर्षे त्यांनी खडतर सेवा बजावली. 2020 मध्ये लातूर जिल्ह्यात बदली झाल्यानंतर महामार्ग पोलिस ठाण्यात ते कार्यरत आहेत.