26.4 C
Pune
Wednesday, May 7, 2025
Homeसाहित्य*प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान*

*प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान*

पटना, ता.(विशेष प्रतिनिधी )-ईशीपूर, भागलपूर येथील गाँधीनगरात असलेल्या विक्रमशीला हिंदी विद्यापीठाने गोमंतकातील प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना पटना येथे अलीकडेच झालेल्या एका समारंभात विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली.

पटना येथील हिंदी साहित्य संमेलनातर्फे आयोजित बहुभाषिक कविसंमेलनात हिंदी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अनिल सुलभ व बिहार दूरदर्शनचे राजकुमार नाहर यांनी मानाची शाल व ट्रॉफी प्रदान केली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रेमचंद पाण्ड्ये उपस्थित होते. या समारंभाला गुंफण साहित्य अकादमीचे अध्य़क्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, अपूर्वा ग्रामोपाध्ये, रजनी रायकर, साहित्यलेणी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चित्रा प्रकाश क्षीरसागर व दीपा मिरिंगकर आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बहुभाषिक कविसंमेलनात बच्चा ठाकूर, ब्रह्मानंद पांड्ये, जयप्रकाश पुजारी, श्याम बिहारी प्रभाकर, तलत परवीन, मोहम्मद अस्लम, शशिभूषण कुमार, बसंत गोयल, डॉ. चंद्रशेखर आजाद, एजाज अहमद, अमरनाथ शर्मा. नंदनकुमार आदी बिहारी कवींसह उपस्थित गोमंतकीय कवी- कवयित्री व सातारा (महाराष्ट्र)चे बसवेश्वर चेणगे, बाँके बिहारी साव, अवध बिहारी सिंह आदींनी कविता सादर केल्या. ब्रह्मानंद पाण्डे यांनी सूत्रसंचालन केले व कृष्ण रंजन सिंह यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]