23.1 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeआरोग्य वार्तापोद्दार हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांसाठीच्या पाणपोईचे उद्घाटन

पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांसाठीच्या पाणपोईचे उद्घाटन

लातूर, दि. ०४:

वैद्यकीय सेवेबरोबरच विविध सामाजिक कार्यात हिरीरीने आघाडीवर असणाऱ्या येथील विख्यात अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार यांच्या  पोद्दार हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सेंटरच्यावतीने गुढी पाडव्याचे औचित्य साधून  नागरिकांसाठीच्या पाणपोईचे उद्घाटन  करण्यात आले. या पाणपोईच्या माध्यमातून  नागरिकांसाठी थंड  शुद्ध पाण्याचे जार  उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शनिवारी, २ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी  जितेंद्र जगदाळे यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ. वर्षा शिरीष कुलकर्णी,  नगरसेवक कैलास कांबळे , डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ संजयकुमार  शिवपूजे , लक्ष्मीकांत कर्वा , जयेश बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने सन  १९९९ पासून प्रतिवर्षी उन्हाळ्यात नागरिकांच्या सोयीसाठी अशा प्रकारच्या पाणपोईची उपलब्धी करून देण्यात येते. सुरुवातीची काही वर्षे रांजणाच्या माध्यमातून तहानलेल्या लोकांना पाण्याची सोया करून दिली जायची. सन २०१४ पासून रांजणाऐवजी शुद्ध थंड पाण्याचे जार  उपलब्ध करून दिले जात आहेत. या पाणपोईच्या माध्यमातून दररोज किमान २४ ते २५ जार शुद्ध व थंड पाण्याचा लाभ तहानलेले नागरिक घेतात. विशेष म्हणजे पाणपोईवर कोणाचेही नावाचा उल्लेख न करता मानवतेच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविला जातो.  मागच्या  कोरोना काळात पाणपोई सुरु करणे शक्य झाले नसल्याने त्यादरम्यान पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसापासून ते दि. १ ऑगस्टपर्यंत नागरिकांना सॅनिटायझरची उपलब्धी करून देण्यात आली होती. यावर्षीची  ही पाणपोई दि. ०१  जूनपर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे. डॉ.अशोक पोद्दार हे जरी व्यवसायाने डॉक्टर असले तरी उत्तम सामाजिक जाण आणि भान असलेले व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. प्रतिवर्षी मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ते रुग्णांवर उपचार तसेच मोफत औषधी उपलब्धी करून देण्याचे काम मागच्या अनेक वर्षांपासून अविरतपणे करीत आहेत. त्याचप्रमाणे दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच आर्थिक सहाय्य  करण्याचे कामही ते नियमितपणे करीत असतात. सर्वसामान्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. यावेळी आपले विचार व्यक्त करताना उपविभागीय पोलीस अधिकारी  जितेंद्र जगदाळे यांनी डॉ.अशोक पोद्दार यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्याची जाण  नसलेली व्यक्ती पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शोधूनही सापडणार नसल्याचे सांगितले. त्यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा,असे आवाहनही जगदाळे यांनी केले.    

—————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]