16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडीपोद्दार हाँस्पिटलमध्ये अस्थिरोग शिबीर

पोद्दार हाँस्पिटलमध्ये अस्थिरोग शिबीर

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त
पोद्दार हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग शिबिराचे आयोजन


लातूर, दि. १९ :

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या
वाढदिवसाचे औचित्य साधून येथील सिग्नल कॅम्प परिसरातील पोद्दार हॉस्पिटलअक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटर मध्ये सोमवार,दि. २१ मार्च २०२२ रोजी
मोफत अस्थिरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हॉस्पिटलचेसंचालक डॉ. अशोक पोद्दार यांनी दिली.
पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने प्रतिवर्षी पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावाढदिवसानिमित्त अशा प्रकारच्या अस्थिरोग शिबिराचे आयोजन केले जाते.


यावर्षी सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत नांव नोंदणी केलेल्यारुग्णांची मोफत अस्थिरोग, फिजिओथेरपी , मशीनद्वारे हाडांच्या ठिसूळपणाची
तपासणी करण्यात येणार आहे. रुग्णांना उपलब्धतेनुसार मोफत औषधीही देण्यातयेणार आहेत. शिबिरात तपासणीसाठी येणाऱ्या आवश्यक त्या रुग्णांना रक्ततपासणी व डिजिटल एक्सरेमध्ये ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. एमआरआय,
सिटी स्कॅन व युएसजी मध्ये २५ टक्के सूट दिली जाणार आहे. या शिबिरातअस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अशोक पोद्दार, डॉ. इम्रान कुरेशी, डॉ. तुषार पिंपळेरुग्णांची तपासणी करून उपचार करणार आहेत.

या शिबिराचा गरजू रुग्णांनी
लाभ घ्यावा,असे आवाहनही डॉ. अशोक पोद्दार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]