!! लातूरकरांसाठी आनंदाची बातमी !!
पुणे – हरंगुळ – पुणे इंटरसिटी रेल्वे दररोज सुरू झाली असून,
१० ऑक्टोबर, २०२३ पासून ही ट्रेन धावायला सुरुवात करेल.
साधारण 8 ऑक्टोबर पासून तिकीट बुकिंग सुरु होईल.लातूर कडून पुण्यासाठी व पुण्यावरून लातूर साठी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची सोय या माध्यमातून होणार आहे., लातूर, धाराशिव, जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं गरजेचं आहे. जेणेकरून या सेवेचा सर्वांना लाभ घेता येईल.तसेच सदर रेल्वेचा कालावधी डिसेंबर नंतर संपल्यावर ती चालूच राहण्यासाठी आपला प्रतिसाद कामी येईल..

रेल्वेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल..
सकाळी ६:१० वाजता – पुण्याकडून लातूरला रवाना होईल आणि दुपारी १२:१० मी. लातूरला पोहोचेल.
तसेच दुपारी ३:०० वाजता लातूर हून पुण्याला रवाना होईल आणि रात्री ९:०० वाजता पुण्यात पोहोचेल.
हडपसर, उरुळी, केडगाव, दौंड, जेऊर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन आणि धाराशिव असे थांबे.
गाडी क्रमांक 01487 पुणे ते हरंगुळ-
1) पुणे – सकाळी 6.10 वाजता
2) उरुळी कांचन – सकाळी 6.40
3) केडगावं- सकाळी 7.00
4) दौंड- सकाळी 7.40
5) जेऊर – सकाळी 8.40
6) केम – सकाळी 8.55
7) कुर्डुवाडी – सकाळी 9.20 8) बार्शी- सकाळी 10.05
9) उस्मानाबाद (धाराशिव) – सकाळी 10.45
10) हरंगुळ – दुपारी 12.50
गाडी क्रमांक 01488 हरंगुळ ते पुणे-
1) हरंगुळ – दुपारी 3.00
2) उस्मानाबाद (धाराशिव) – दुपारी 4.05
3) बार्शी- दुपारी 4.45
4) कुर्डुवाडी – संध्याकाळी 6.10 5) केम – संध्याकाळी 6.20
6) जेऊर – संध्याकाळी 6.40
7) दौंड – रात्री 7.35
8) केडगावं- रात्री 7.45
9) उरुळी कांचन – रात्री 8. 10
10) पुणे- रात्री 9.00
- एक प्रथम वातानुकूलित, एक व्दितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, पाच शयनयान, तीन सामान्य द्वितीय श्रेणीसह लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार अशी रचना असेल.या विशेष गाडीला पुणे नांदेड एक्स्प्रेसचा रेक वापरला जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे .