तेलबियाचे उत्पादन वाढीस केलेल्या विशेष कार्याची दखल, मुंबईत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते वितरण
औसा;(प्रतिनिधी )-कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष मा.आ.पाशा पटेलांनी तब्बल दहा वर्ष अथक परिश्रम घेवून देशातील तेलबिया उत्पादन वाढीसह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष कार्य केले.या उल्लेखनीय कार्याची दखल घेत
द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई, जीजीएन रिसर्च राजकोट/इंदूरच्या सहकार्याने,यंदाच्या “श्री गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड्स”करिता निवड करण्यात आली आहे.
२८ सप्टेंबर रोजी श्री.गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई च्या ६० व्या वर्षाच्या समारंभात सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.मुंबईत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराची स्थापना तीन महत्त्वाच्या श्रेणींमध्ये उल्लेखनीय योगदानासाठी करण्यात आली.यात १) कमोडिटी विश्लेषक/ट्रेडर २)इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया आणि ३) शेतकरी/एफपीओ/सेवा रोख पुरस्कारासह रु. ५०,०००/ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.तेलबिया उत्पादक शेतकर्यांना पाठिंबा देण्याच्या तुमच्या अतुलनीय समर्पण आणि तळमळामुळे पाशा पटेलांची ‘श्री गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड 2022-23’ करिता निवड केल्याचे द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई चे अध्यक्ष अजय झुंझुनवाला यांनी सांगितले. या पुरस्कार सोहळ्या करिता डॉ. भागवत कराड, केंद्रीय वित्त राज्यमंत्री, भारत सरकार यांच्यासह कृषी मंत्रालयाचे सचिवांची ही उपस्थिती राहणार आहे.