●सम्राट मित्रमंडळाचा उपक्रम
अहमदपूर दि.13 एकीकडे प्रकाशाचा झगमगाट आणी दूसरीकडे प्रचंड अंधार..एकीकडे पंचपक्वान्न तर दूसरीकडे एक वेळच्या भाकरीची चिंता…अशा दूर्लक्षीत व उपेक्षित आणी वंचित कूटूंबांना दिवाळी च्या कोरड्या शुभेच्छा देण्यापेक्षा कपडे, मिठाई देवून शुभेच्छा दिल्या आणी ख-या अर्थाने दिवाळी दिवाळी साजरी केली.
शहरातील कचराडेपो च्या बाजूला रहाणा-या छोट्या- छोट्या पाल झोपड्यात अद्याप प्रकाश काय आहे याची कल्पना नाही.सर्व जीवनच अंधकारमय…या अंधारातच चाचपडत फक्त मरण येत नाही म्हणून जगणारा हा समूह… घरातील करती मंडळी काबाडकष्ट करण्यासाठी बाहेर पडले की,लहान लहान निरागस मूले कचरा,प्लास्टिक वेचण्यात भटकंती करतात..कांही जण भीक मागतात अशा अवस्थेत यांचं दैनंदिन जगणं…याच पालावर झोपड्यात जावून सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी कपडे मिठाई वाटप करत ख-या अर्थाने वंचीत उपेक्षीत दूर्लक्षीत समूहाच्या सोबत दिवाळी साजरी केली.
प्रत्येक वर्षी दीपावलीच्या निमित्ताने अशा कूटूंबांना आधार देण्याचा प्रयत्न मित्रमंडळाच्या वतीने केला जातो.या वस्तीवरील लहान बालके,वृध्द तसेच महिला यांना कपडे,मिठाई इत्यादी साहित्य वाटप केले.
या वेळचं वातावरण खूपच भावनिक झाले होते. एकीकडे डोळे दिपवनारी प्रगती आपण पहात असताना अनेक उपेक्षीत समूह कायम अंधारात आहेत.अशा समूहा समवेत दीपावली साजरी करण्यात खरे आत्मिक समाधान आहे.शक्य होईल तेवढी मदत येथील समूहाला होईल यासाठी कायम पूढाकार घेणार असल्याचे या प्रसंगी युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी सांगीतले.
तसेच त्यानंतर सातत्याने स्वच्छतेसाठी अग्रणी असलेल्या नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सूध्दा मिठाई बाॅक्सचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास जय भुतडा,शामकुमार द्वारकादास,गफारखान पठाण,गूंडाळे सावकार यांनी विशेष सहकार्य केले. वेळी सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण, दादासाहेब देशमूख, अण्णाराव सूर्यवंशी, गणेशराव मूंडे,अजय भालेराव,भिमराव कांबळे,शिवाजीराव भालेराव, सचिन बानाटे,आकाश पवार,शिलाताई शिंदे, राणी गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.