पालकमंत्री अमित देशमुख यांच्या गाठीभेटी

0
269

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी घेतल्या 

विविध संस्था संघटना पदाधिकांऱ्यासह नागरिकांच्या भेटीगाठी, 

लातूर -(प्रतिनिधी)-राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आज गुरुवार दि. ९ सप्टेंबर २१ रोजी सकाळी बाभळगाव निवास्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध शिष्टमंडळासह नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन निवेदनाचा स्वीकार करून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधितांना सूचना केल्या. काँग्रेस पक्ष संघटनेत नव्याने संधी मिळालेल्या नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड. समद पटेल, लक्ष्मण कांबळे, रेणापुर तालुका अध्यक्ष प्रमोद जाधव, पंचायत समितीच्या सभापती सरस्वती पाटील, उपसभापती प्रकाश उपाडे, नूतन गट शिक्षणाधिकारी संजय पंचगल्ल पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे, प्रताप पाटील, तानाजी फुटाणे, पंडित अडसूळ, भीमाशंकर शेटे, रघुनाथ शिंदे, ज्ञानेश्वर सागावे, अशोक सूर्यवंशी, मनोज सूर्यवंशी, शहाजी चव्हाण, ज्योतीराम शिंदे, अशोक सावळसुर, राज शिरसागर, दिनकर मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, जीवनराव देशमुख, महेश काळे, सुभाष घोडके, अभिषेक पतंगे, प्रवीण सूर्यवंशी, डॉ. आनंद पवार, रमेश सूर्यवंशी, आदींसह विविध शिष्टमंडळातील सदस्य, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक आठ मधील शिष्टमंडळाने पालकमंत्री ना. अमित देशमुख यांची भेट घेऊन आज मोहल्ला क्लीनिकचे उद्घाटन रत्नापूर चौकात आयोजित केलेले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक आठ मधील एकमेव अशी जागा ही मोहल्ला क्लीनिकसाठी वापरत असून त्याठिकाणी महिलांसाठीची वॉकिंग ट्रॅकची व्यवस्था व लहान मुलांना खेळण्यासाठी या मैदानाचा वापर होतो तरी या ठिकाणी मोहल्ला क्लीनिक उभारू नये, अशी विनंती प्रभाग क्रमांक आठ मधील शिष्टमंडळाने पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्याकडे केली यावेळी श्री देशमुख यांनी प्रशासनाशी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

नुतन पदाधिकारी यांना दिल्या

पूढील कार्यास शुभेच्छा

नुकतेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी गोरोबा लोखंडे, लातूर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी इम्रान सय्यद यांची निवड झाली आहे. आज सकाळी बाभळगाव निवास्थानी पालकमंत्री ना. अमित देशमुख यांची त्यांनी भेट घेऊन निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी ना. देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here