16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*पानगाव येथे हैदराबाद - संभाजीनगर रेल्वेला  थांबा*

*पानगाव येथे हैदराबाद – संभाजीनगर रेल्वेला  थांबा*

आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून थांबा 

          लातूर दि.१७ – रेणापूर तालुक्‍यातील पानगाव येथील रेल्वे स्थानकातून जलद गतीने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी भाजपा नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे ९ ऑक्टोबर रोजी दिल्ली दौऱ्यात केली होती. सदरील मागणीची दखल घेऊन संभाजीनगर – हैदराबाद – संभाजीनगर या एक्सप्रेस रेल्वेला पानगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने नुकताच घेतला आहे.

          केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी दिल्ली येथे ९ ऑक्टोबर सोमवार रोजी भेट घेऊन रेल्वे प्रवाशांच्या आडी-अडचणी बाबत सविस्तर चर्चा केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी नागपूर नंतर केवळ रेणापूर तालुक्यातील पानगाव येथेच आहेत. या अस्थिच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून अनुयायी मोठ्या संख्येने पानगाव येथे येत असल्याने त्‍याचबरोबर दुरवरचा प्रवास करणा-या प्रवाशांसाठी पानगाव येथील रेल्वे स्थानकावरून जलद गतीने धावणाऱ्या हैदराबाद संभाजीनगर यासह सर्वच रेल्वेंना थांबा देऊन होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली होती.

      आ. रमेशअप्पा कराड यांच्या मागणीची दखल घेऊन रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्‍काळ सूचना केल्या होत्या. त्यानुसार हैदराबाद- संभाजीनगर -हैदराबाद रेल्वेला पानगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने १६ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार घेतला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली हैदराबाद संभाजीनगर हैदराबाद या रेल्वेचा थांबा कोरोना काळापासून बंद करण्यात आला होता. आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नामुळे सदर रेल्वेला पुन्हा थांबा देण्याचा निर्णय झाल्यामुळे पानगाव आणि परिसरातील रेल्‍वे प्रवाशांकडून आनंद व्‍यक्‍त केला जात आहे. 

संभाजीनगर – हैदराबाद – संभाजीनगर या एक्सप्रेस रेल्वेला पानगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्‍याबद्दल रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील, भाजपा नेते आ. रमेशअप्‍पा  कराड आणि खा. सुधाकर शृंगारे यांचे पानगाव आणि परिसरातील भाजपाचे अनंत चव्‍हाण, सतिश अंबेकर, सुकेश भंडारे, गोपाळ शेंडगे, भागवत गिते, अमर चव्‍हाण, श्रीकृष्‍ण जाधव, सुंदर घुले, शिला आचार्य, मारुती गालफाडे, गणेश तुरुप, रमाकांत संपते, माधव घुले, रमेश केंद्रे, प्रकाश गालफाडे, माधव गुडे, संतोश तुरुप, दिगंबर येडले, नवनाथ पांचाळ, जयराम जाधव, बाबुराव कस्‍तूरे, सतिश कुलकर्णी, दत्‍ता अंबेकर, रफीक शेख, अविनाश कुरे, शिवाजी जाधव, नाथराव गिते, विरेंद्र चव्‍हाण यांच्‍यासह अनेकांनी आभार व्‍यक्‍त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]