ज्ञानेश्वर जाधव व पलक शहा यांना एम्स् दिल्ली
नांदेड ; दि.३( प्रतिनिधी ) -महाराष्ट्राचा महाब्रँड असलेल्या आयआयबीने एम्स मेडीकल कॉलेजस् साठी जाहीर झालेल्या पहिल्याच यादीत ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवत एक नवा उच्चांक प्रस्थापित केला असून त्याबरोबरच आयआयबीच्या १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मेडीकल साठी प्रवेश मिळेल असा विश्वास आयआयबीचे मुख्य कार्यकारी संचालक श्री दशरथ पाटील व टिम आयआयबीने व्यक्त केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या पहील्याच यादीत आयआयबीचा धमाका तर यावर्षी एम्स साठी ७५ पेक्षा अधिक विद्यार्थी ठरतील पात्र ठरले आहेत.
आयआयबीच्या च्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी अनिवार्य असलेल्या नीट-२०२३ परीक्षेत अलौकिक यश प्राप्त करत भारतातील टॉप कॉलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या AIIMS, JIPMER, MAMC, BHU या भारतातील टॉप मेडिकल कॉलेज मध्ये पहिल्याच यादीत तब्ब्ल ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवत एक नवा ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला असून मागील २४ वर्षाच्या वाटचालीत आयआयबीने १८ हजांरापेक्षा अधिक विद्यार्थी हे एमबीबीएस साठी पाठवून डॉक्टर्स फॅक्टरी हे बिरुद खऱ्या अर्थाने खरं ठरविले आहे..
यावर्षीच्या नीट २०२३ च्या निकालात आयआयबी च्या पलक जाजू, सायली महिंद्रकर व पलक शहा या विद्यार्थिनीनी ७२० गुणापैकी (७०५), गुण प्राप्त करत सर्वोत्तम स्थान प्राप्त केले आहेत तर शिवम माहूरे, ज्ञानेश्वर जाधव, साक्षी वजिरगावे, अर्जुन लिगंदळे या ०४ विद्यार्थ्यानी ७२० पैकी ७०० गुण प्राप्त करत विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यासोबतच उझेर रुलानी ६९७ भारती देशमुख व अनुष्का भारसवाडकर यांनी ७२० पैकी ६९६ गुण प्राप्त करत घवघवीत यश मिळविले आहेत .
यासोबतच आयआयबीने विषयावार गुण प्राप्तीमध्येही गगनभरारी घेतली असून यात फिजिक्स विषयात १८० पैकी १८० गुण घेणारे एकुण ०६ विद्यार्थी आहेत. यात पलक जाजू, सर्वेश हटकर, उझेर रुलानी, रामप्रसाद पाटिल, सायली कदम, हफिज सोहेल यांचा समावेश आहे. तर बायोलॉजी या विषयात ३६० पैकी ३६० गुण घेणारे एकुण ०६ विद्यार्थी आहेत. यात पलक शहा, ज्ञानेश्वर जाधव, भारती देशमुख, अक्षय मिसाळ, शिवाणी जाधव, गणराज नल्लावार यांचा समावेश आहे. तसेच केमेस्ट्री या विषयात १८० पैकी १८० गुण १८० गुण प्राप्त करणारे एकुण ०२ विद्यार्थी आहेत. यामध्ये सायली महिंद्रकर व तेजस पोरे या दोघांचा समावेश आहे
आयआयबी पॅटर्नच्या गुणवत्तेचा डंका – दशरथ पाटील
एम्स मध्ये पहिल्याच यादीत तब्ब्ल ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मिळविलेला प्रवेशाचे यश म्हणजे आयआयबी च्या उकृष्ट शिकवणी आणि व्यवस्थापनावर शिक्कामोर्तब झाले असून, विद्यार्थी शिक्षकांची मेहनत आणि पालकांचा विश्वास यास आम्ही हे यश समर्पित करत असल्याचे टीम आयआयबी ने सांगितले. मागील वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या आयआयबी एम्स् ५० बॅचचे मुळे यापुढेही असेच एम्स साठी सिलेक्शन होत राहतील किंबहुना हा टक्का वाढवण्यासाठी आयआयबी प्रयत्नशील असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. या अव्वल यशासाठी विधार्थ्यांचा आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, प्रयत्नांतील सातत्य, शिक्षकांचे सर्वोत्तम मार्गदर्शन व या सर्व बाबीनां नियोजनबध्द करण्यासाठी व्यवस्थापनाने केलेले प्रयत्न या सर्व बाबी कारणीभूत आहेत या ऐतिहासिक उच्चांकामुळेच भारतातील टॉप वैद्यकीय महाविद्यालयात आयआयबी पॅटर्नच्या गुणवत्तेचा डंका वाजला आहे महाराष्ट्रातून एकाच वेही एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी देशातील सर्वोच्च अशा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशास पात्र ठरल्याची ही पहीलीच वेळ आहे अशी प्रतिक्रिया आयआयबीचे मुख्य कार्यकारी संचालक श्री दशरथ पाटील यांनी व्यक्त यावेळी व्यक्त केली..