अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या अधिसेविका यांची चौकशी व कार्यवाहीची मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन व निदर्शने
लातूर ( प्रतिनिधी) –
परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालय सोलापूरच्या प्रशिक्षणार्थीनी दिनांक ०२/०८/२०२२ रोजी संस्थेचे अधिष्ठाता यांचेकडे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ मनिषा शिंदे यांच्या विरोधात लेखी तक्रार केली होती. या अनुषंगाने मा. अधिष्ठाता कार्यालया मार्फत संस्था स्तरावरील चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या चौकशी समितीने प्रशिक्षणार्थी आणि डॉ मनिषा शिंदे यांची चौकशी करून आपला अहवाल मा. अधिष्ठाता कार्यालयास सादर केला होता.
या चौकशी समितीच्या अहवालानुसार डॉ मनिषा शिंदे यांच्या वर कोणत्याही प्रकारचे आरोप सिद्ध झालेले नाहीत. पण त्यानंतरही तक्रारदार प्रशिक्षणार्थी अनेक लोकप्रतिनिधी, पत्रकार व संस्थाबाहेरील विविध सामाजिक संघटना/संस्थेच्या प्रतिनिधींना भेटून त्यांच्या मार्फत डॉ मनिषा शिंदे यांना त्यांचा फोन करून धमकी वजा दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या मुळे डॉ मनिषा शिंदे मॅडम यांचे कौटूंबिक आरोग्य व मानसिक आरोग्य विस्कळीत होत आहे.
परिचारीका महाविद्यालयाच्या सर्व प्रशिक्षणार्थी मा.अधिसेविका यांच्या अधिपत्याखाली असलेल्या वस्तीगृहात राहतात. शासकिय वस्तीगृहात रहात असताना शासकिय नियमांचे पालन करणे अनिवार्य असते. शासकिय वसतिगृहातून बाहेर जाण्यासाठी मा.अधिसेविका यांची परवानगी घेणे अनिवार्य असते. सध्या प्रशिक्षणार्थी नीयमांचे उल्लंघन करुन लोकप्रतिनिधी, विविध संघटनेच्या पदाधिकारी, व काही अज्ञात व्यक्तींची यांची भेट घेण्यासाठी वस्तीगृहातून बाहेर जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अश्या वेळी या प्रशिक्षणार्थीनी मा. अधिसेविका यांनी परवानगी कशी दिली,किंवा या गोष्टी करण्या पासून परावृत्त का केले नाही असा प्रश्न पडतो किंवा ह्या सर्व घटनांकडे मा अधिसेविका जाणीवपूर्वक, डॉ मनिषा शिंदे यांना त्रास देण्याच्या हेतूने दुर्लक्ष करत आहेत असे स्पष्ट निदर्शनास येते.
विद्यार्थ्यांच्या तक्रारींमध्ये बहुतांश जबाबदाऱ्या अधिसेविका यांच्याही आहेत परंतु त्या या सर्व प्रकारात तटस्थ भुमिकेत दिसतात, मा. अधिसेविका व वस्तीगृह परिसेविका ह्या करत असलेल्या गैरप्रकारांबाबत संघटनेने वेळोवेळी प्रशासनास कळविले आहे परंतु यांच्याबाबत कसलीही कार्यवाही झालेली नाही. यास्तव विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त न करता त्यांचं समर्थन करुन प्राचार्या व संघटनेच्या राज्याध्यक्ष डॉ मनीषा शिंदे यांची व पर्यायाने परिचारिका संवर्गाची तथा संस्थेची नाहक बदनामी व मानहानी करण्यासाठी सहाय्य करीत आहेत असे दिसते.अधिसेविका ह्या यापुर्वी ससून सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत होत्या. तिथेही परिचारिका संवर्गाला यांच्याकडून प्रचंड त्रास सहन करावा लागला एवढेच नाही तर एका सहायक अधिसेविकांचा मृत्यु यांच्या त्रासामुळे झाला. यामुळेच त्यांचे निलंबन ही झाले होते आणि २०२० पासून त्यांच्यावरील विभागीय चौकशीची कार्यवाही आजतागायत पुर्ण होऊ शकली नाही. यांच्याच तक्रारीमुळे संघटनेच्या माजी अध्यक्षांवरही नाहक कार्यवाही झाली होती. त्यांनी न्यायालयीन लढा जिंकला परंतु अधिकाराचा गैरवापर करुन परिचारीका संवर्गाचा छळ करणाऱ्या अधिसेविका यांच्यावर कसलीही कार्यवाही होत नाही. त्यांची विभागीय चौकशी दोन वर्षांपासून प्रलंबित कोणाच्या वरदहस्ताने आहे? याबाबतच्या योग्य त्या चौकशी व कार्यवाहीच्या मागणीस्तव दि.०७/०९/२०२२ पासून, लातूरसह राज्यातील सर्व परिचारीका रोज २ तास काम बंद आंदोलन व निदर्शने करीत आहेत.व योग्य ती कार्यवाही नाही झाल्यास भविष्यात अधिक तीव्र व पुर्णवेळ आंदोलन केले जाईल. अशी माहीती संघटनेच्या ,राज्यसरचिटणिस सुमित्रा तोटे यांनी दिली. यावेळी राज्यकार्यकारिणी सदस्य पांडूरंग गव्हाणे, कोअर कमिटी सदस्य योगेश वाघ जिल्हा उपाध्यक्ष संजीव लहाने ,रेणुका रेड्डी, कार्याध्यक्ष दिपक सोळंके,संघटक उणिता देशमाने, सहसचिव रमांजली माने, प्रशांत केंद्रे,सहखजिनदार बालिका सावंत,संभाजी केंद्रे, दिपक शिंदे, विवेक वागलगावे, सदस्य रेणुका बोरोळे, मजहर शेख धनश्री गोसावी,भगवान केंद्रे,ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते