लातूर/प्रतिनिधीः-
येथील महर्षी परशुराम जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी येथील तरुण उद्योजक प्रवीण कस्तुरे यांची निड करण्यात आली. समितीचे पदाधिकारी, सदस्य व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक गुढीपाडव्या दिवशी येथे झाली. यात ही निवड जाहीर करण्यात आली.
मागील नऊ वर्षांपासून येथे महर्षी परशुराम यांची जयंती हर्षोल्हासात साजरी केली जाते. मागील दोन वर्षांचा कोरोना कालावधी वगळता जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. प्रविण कस्तुरे हे तरुण उद्योजक आहेत. हॉटेल गंधर्व, श्री इंडस्ट्रीज हे उद्योग व प्रबोधन प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रमांत महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. महर्षी परशुराम यांच्या जयंती उत्सवात प्रारंभापासूनच त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची यंदाच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी अॅड. संजय पांडे, प्रदीप नणंदकर, सुधाकर जोशी, जगदीश कुलकर्णी, संजय निलेगावकर, प्रसाद उदगीरकर, अॅड. महेश खडके, अॅड. युवराज संदीकर, अॅड. वैभव कुलकर्णी, डॉ. मंगेश कुलकर्णी, प्रदीप वेल्लाळ, अॅड. प्रसाद पांडे, बाळासाहेब देशपांडे, यशवंत अणदूरकर, श्रीपाद आघोर, विवेक कुकर्णी, रोहन देशमुख, रोहन दिवाण, विश्वास लातूरकर, ओंकार कुलकर्णी, डॉ. रविराज पोरे उपस्थित होते.