• मध्यंतरी दूरदर्शन वर एका प्रख्यात साहित्यिकाची मुलाखत सुरू होती… त्यावेळी लतादीदींचा विषय निघाला. लतादीदींचे वर्णन करताना त्यांनी ज्या शब्दात ते केलं ते शब्द अक्षरशः कोरले गेले. ते साहित्यिक म्हणाले… जर परमेश्वराने या पृथ्वीतलावर वास्तव्य करण्याचे ठरवले तर तो आपल्या वास्तव्यासाठी जी सुंदर जागा शोधेल ती जागा असेल.. लता मंगेशकरांचा गळा.

• अर्थात लतादीदींच्या दैवी स्पर्श लाभलेल्या स्वराचे वर्णन करण्यासाठी आपले शब्द पुरेसे नाहीत. हे नक्की. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे आकाश आणि पृथ्वी, दैवी शक्ती आणि मानव यांना जोडणारा दुवा म्हणजे लतादीदींचे स्वर.
• आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब अशी की त्या मराठी होत्या. या भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. आंबेडकर जन्मले. या प्रभावळीत आता लताजींच नाव अजरामर राहणार आहे.
• या पुढे शतकानुशतके ज्यांचं नाव आणि स्वर ओठावर असेल त्या लतादीदीच असतील.
• आपल्या पिढीने हे अनुभवलं.. बघितलं.. हे आपलं भाग्य.
• गेल्या रविवारी गोव्यातील मंगेशकर कुटुंबियांच कुलदैवत असलेल्या श्री मंगेशाच दर्शन घेण्याचा योग आला. मंगेशकर कुटुंबीयांच्या पुढाकाराने या देवस्थानाच पालटलेलं रूप खूपच विलोभनीय आहे.
• आज स्वरसम्राज्ञी देहरूपाने अनंतात विलीन झाली आहे. शतशः प्रणाम.
–संजय झेंडे, धुळे.
(9657717679)
🙏🏻🚩🙏🏻