परभणीच्या “परभणीच्या “अवलिया’चा सायकल चालविण्याचा विक्रम सायकल चालविण्याचा विक्रम
शंकर नागनाथ फुटके यांचा एक लाख किलोमीटर सायकलद्वारे प्रवास
परभणी,दि.03(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सायकलिस्ट बंधू आणि भगिणींसह सर्वसामान्य नागरिकांना अभिमान वाटेल असे सायकलिस्ट शंकर अण्णा फुटके यांनी नुकतेच सायकलिंगचा 1 लक्ष किलो मीटरचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. असा पराक्रम करणारे ते आपल्या जिल्ह्यातील पहिले सायकलिस्ट आहेत.
यानिमित्त फुटके यांचा बुधवार 3 जुलै रोजी सकाळी 7 वाजता सर्व सायकल प्रेमीं व नागरिकांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात गौरव केला. यावेळी कुलगुरू डॉ. इंद्र मणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी फुटके यांचा गौरव करतेवेळी सायकलप्रेमींनी वृक्ष लावून हा विक्रम साजरा केला. या सत्कार सोहळ्याचे प्रस्ताविक जिल्हा ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक यांनी केले. त्यात त्यांनी फुटके यांनी एक लाख किलोमीटर सायकलिंगची जी विक्रमाची गवसणी साधली आहे, त्याचा आरोग्यासी किती मोठा संबंध आहे हे निदर्शनास आणून दिले.
कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी आपल्या मनोगतात फुटके यांच्या विक्रमाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर भावी आयुष्यात सातत्याने अशाच पद्धतीने सायकलिंग करून आपण पाच लाख किलोमीटर पर्यंत सायकलिंग करुन आपणच आपला विक्रम मोडण्याचे आव्हान त्यांना दिलं. फुटगे यांच्यातील असलेली जिद्द, शरीर यष्टी यांचं त्यांनी भरभरून कौतुक केलं आणि परभणी शहरात ह्या गोष्टी होऊ शकतात याचा आनंद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. दरम्यान, या सोहळ्यास डॉ. आनंद बडगुजर, सुधीर सोनुनकर, प्रसाद वाघमारे, माणिक गरुड, श्रीनिवास संगेवार, राजेश्वर वासलवार, नीरज पारख, कल्याण देशमुख, गिरीश जोशी, संदिप पवार, बालाजी तावरे, नितीन शेवलकर, ओमकार भेडसुरकर, डॉ. रितेश अग्रवाल, माधव माडगे, सिद्धांत ओझा, राहुल सिरसेवाड, डॉ. राम पवार, डॉ. शेखर इंगळे, डॉ. नीरस पाटील, डॉ. सागर मोरे, डॉ. संदीप मोरे, डॉ. सचिन देशमुख, डॉ. विठ्ठल सिसोदे, विलास जैन, प्रमोद शिंदे, उदय खलसे, किरण टाक, बंडूशेठ रापते, सचिन शिंदे, दत्ता बनसोडे, सचिन माळवटकर, दिनेश बिंदू, विशाल वट्टमवार, दिलीप शेठ शर्मा आदींची उपस्थिती होती.
फुटके यांचा विक्रम प्रेरणादायी…
शंकर अण्णा फुटके यांनी सायकलने एक लाख किमी प्रवास केला. लखपती सायकलपटू अण्णा हे बिरूद त्यांना मिळाले ते त्यांच्या अथक परिश्रमानेच. ऊन, वारा, पाऊस यांचा विचार न करता दररोज सातत्याने सायकल चालविणे हे सोपे काम नव्हे. तसेच दुसर्यांना प्रोत्साहन देऊन फुटके यांनी इतरांनाही सायकलची आवड निर्माण करुन दिली. नवीन सायकल खरेदी करण्यापासून ते सायकलची आवड निर्माण होईपर्यंत फुटके यांच्या आग्रहातून अनेक सायकलपटू घडले. फुटके यांच्या अर्थाने लखपती होण्यापेक्षा लखपती असणे प्रेरणादायी आहे.
परभणीतील सायकल चळवळीने धरले बाळसे
परभणी शहरात 2018 पूर्वीपासून जे मोजके लोकं नियमित सायकलिंग करत असत त्यांचे पैकी फुटके एक आहेत. काही लोकांची सवय ही व्यक्तिगत स्तरापर्यंत मर्यादित राहिली परंतु, फुटके यांनी स्वतः सोबत इतरांना प्रेरणा दिली, सहकार्य केले. त्यामुळे बरेच शिक्षक, व्यवसायिक, उद्योजक, विविध क्षेत्रातील इच्छुक, उत्साही मंडळी सायकलिंग करायला लागली आणि आपल्या सोबत इतरांना सहभागी करू लागली. कोविड -19 कालावधीत शहरात ही सायकलिंगची सवय आणखी व्यापक स्वरूप धरू लागली आणि कोविड कालावधी नंतर सायकलिंग ही सवय नाही तर चळवळ रूपात पुढे आली. परभणी शहरातील काही उत्साही तरुण मंडळी राज्य आणि राज्याबाहेर सायकल स्वारी करून नवीन पायंडे पडायला लागली यामध्ये तावर, नीरज सेठ, डॉ.पवन चांडक, दिपक तळेकर, प्रकाश बुजूर्गे व इतर मंडळी सहभागी आहेत.