लातूर ; ( एल.पी. उगिले यांजकडून)-पोलीस गणेश विसर्जन बंदोबस्तात व्यस्त असल्याची संधी साधून दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या कुख्यात आरोपींना 4 पिस्टल, एक गावठीकट्टा व 59 जिवंत काढतुस, दरोडाच्या साहित्यासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी..
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पोलीस रात्रगस्त व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करण्याची मोहीम संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.तसेच कोंबिंग ऑपरेशन राबवून चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपींना,फरार आरोपींना ताब्यात घेतले जात आहे. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचे संकलन व विश्लेषण करून गुन्ह्यांची उकल करण्यात येत आहे.
दिनांक 28/09/2023 रोजी चाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना बातमीदार कडून माहिती मिळाली की, लातूर पोलीस गणेश उत्सवाच्या व विसर्जनाच्या बंदोबस्तात व्यस्त असणार याचा अभ्यास करून व तशी संधी साधून काही दरोडेखोर लातूर ते मुरुड जाणारे रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीने साहित्य महाराष्ट्र ग्रामीण बँक ते किया शोरूम दरम्यान संशयितरित्या दोन मोटार सायकल वरून फिरत आहेत अशी माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सदर माहितीची खातरजमा करून सदरची माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी तात्काळ सदरची माहिती वरिष्ठांना कळविली. त्यावरून पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक दिनांक 28/09/2023 रोजी संध्याकाळी 17 30 वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ग्रामीण बँक ते किया शोरूमला जाणारे रोडच्या परिसरात बातमी प्रमाणे पाच इसम रोडच्या साईडला थांबलेले दिसले त्यांच्यावर सदर पथकाने छापा मारून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाच पैकी दोन ताब्यात आले व तीन इसमाने त्यांच्या जवळील दोन बॅग जागेवरच टाकून च्या दिशेने पळून गेले त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळून आले नाहीत. दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना त्यांच्याकडे बॅगा व इतर साहित्यासह पथकामार्फत ताब्यात घेण्यात आले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव
दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले इसम नामे
1) विकासकुमार पिता श्रीगोपाल शरण गुप्ता, वय 27 वर्ष, राहणार पोस्ट तिउरी ठाणा, मानपुर जिल्हा नालंदा राज्य बिहार.(अटक)
2) अमितकुमार रवींद्रसिंग यादव, वय 22 वर्ष राहणार फतवा तहसील, जिल्हा पटना राज्य बिहार.(अटक)
3) शिवकुमार उर्फ संजीव कुमार यादव वय 30 वर्ष, राहणार हाजीपुरा जिल्हा वैशाली राज्य बिहार.(फरार)
4) लकीकुमार राजकुमार प्रधान, वय 28 वर्ष, राहणार गांधी मार्केट, पश्चिम सारंगपूर ,पश्चिम बिहार, दिल्ली.(फरार)
5) छोटू उर्फ ननकी यादव, वय 19 वर्ष, राहणार जामा मजीद जवळ,वैशाली जिल्हा, राज्य बिहार (फरार)
असे असल्याचे सांगितले त्यांची व सोबतच्या आरोपींनी जागेवरच टाकून दिलेल्या दोन बॅगाची झडती घेतली असता त्यांच्याकडे चार पिस्टल, एक गावठीकट्टा, 59 जिवंत काडतुस तसेच एक बारा अॅन्टीना असलेले मोबाईल नेटवर्क जैमर, एक मोबाईल नेटवर्क जामर चे रेंज फिक्पेन्सी डिटेक्टर अॅन्टीनासह, एक चार्जर, चार वेगवेगळ्या कंपनीचे सिमकार्ड सह मोबाईल, काळे रंगाचे कापडी मास्क ,रबरी हॅण्डग्लोज, लोखंडी रॉड, बासुसिंह नांवाचे बनावट आधार कार्ड, एक ड्रायव्हिंग लायसन, दोन मोटार सायकल चे कागदपत्र, मो.सा.क्र. MH-28-BE-6753 चे आरसी बुक, प्रशांतकुमार नांवाने तयार केलेले एक बनावट आधार कार्ड , एक ड्रायव्हिंग लायसन ,एक TVS कंपनीची काळे रंगाची RTR-160 मोटार सायकल पासींग नंबर MH-28-BE-6753 असा असलेली, लोखंडी/प्लॅस्टीकची मुठ असेलेले तीन चाकु व तीन कातरी, एक लोखंडी पक्कड, दोन खाकी रंगाचे चिकटपट्टी बंडल आणि एक कापडी मास्क असा एकूण 356230/-रुपयाचा मुद्देमाल
एक मोबाईल ग्रामर एक मोटर सायकल असे साहित्य मिळून आले.
त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की,पटना येथील कारागृहातील गुन्हेगार सुबोधसिंग राहणार चंडी जिल्हा नालंदा राज्य बिहार याचे संपर्कात असून त्यांने,आम्ही दोघे व आमच्यासोबत असलेले व पळून गेलेले बिहार येथील तीन जणांनी कर्नाटक राज्यातील आळंदी येथे किंवा महाराष्ट्रातील लातूर येथील एखाद्या बँकेवर किंवा सराफ दुकानावर किंवा गोल्ड फायनान्स आस्थापनावर दरोडा टाकण्याचा कट रचला होता. व त्याप्रमाणे दरोडा टाकण्यासाठी पूर्ण तयारीनिशी सदर परिसरात थांबल्याचे कबूल केले.
त्यावरून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस अमलदार खुर्रम काझी यांनी दिलेल्या फिर्याद वरून नमूद पाच आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 730/2023 कलम 399,402, 120(1),420,465,468, भादवी 3 (1) 25,7(अ)/25 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके हे करीत आहेत .
सदर गुन्ह्यातील आरोपी हे बिहार राज्यातील सराईत गुन्हेगार असून गणेशउत्सव व विसर्जनामध्ये पोलीस व्यस्त असणार याचा फायदा घेऊन लातूर मध्ये काहीतरी मोठा दरोड्याचा गुन्हा करण्याच्या पूर्ण तयारीसह चार पिस्टल, एक गावठी कट्टा व तब्बल 59 जिवंत काढतुसह बनावट आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच दरोड्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य हॅन्डग्लोज, मास्क चिकटपट्टी, लोखंडी रॉड, कटर ,कात्रीसह मिळून आलेले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय कार्य कुशलतेने दरोड्याची आधीच माहिती मिळवून दरोडेखोरांना गुन्हा करण्याच्या अगोदरच ताब्यात घेतली आहे. त्यामुळे बाहेर राज्यातील सराईत दरोडेखोरांना दरोड्याचा मोठा गुन्हा करण्यापासून रोखले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात केलेल्या कार्यवाहीचा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कौतुक केले आहे.
तसेच नमूद गुन्हेगारांनी दरोडा टाकताना सदर परिसरातील मोबाईल नेटवर्क जाम होण्याकरिता मोबाईल जामर बाळगलेले असून पोलिसापर्यंत वेळेत माहिती पोहोचू नये, किंवा इतर लोकांचा आपसात संपर्क होऊ नये हा उद्देश असल्याचा दिसून येत आहे.
नमूद फरार आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरू असून संबंधित गुन्हेगारांनी यादी कोठे कोठे गुन्हे केले आहेत या संदर्भात तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार पोलीस अंमलदार खुर्रम काझी, राहुल सोनकांबळे, यशपाल कांबळे, योगेश गायकवाड, संपत फड, मनोज खोसे, प्रदीप चोपणे,रामहरी भोसले यांनी केली आहे.