*पदयात्रेस प्रतिसाद*

0
209

शेतकऱ्यांच्या बांधावर जावून दिलेले वचन मुख्यमंत्र्यांनी पुर्ण करावे -लोकप्रिय आ. अभिमन्यू पवार. 

पदयाञेस शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांचाहि उत्सफुर्त प्रतिसाद..

निलंगा, -(प्रशांत साळुंके)- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून हेक्टरी सरसकट पन्नास हजार नुकसान भरपाई देण्याचे वचन शेतकऱ्यांना दिले होते.परंतु सत्तेत येताच आपल्या वचनाला या अगोदरही बगल दिली होती.आता या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना अत्यंत तुटपुंजी मदतीची घोषणा करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले असून शेतकऱ्यांच्या बांधावर जावून दिलेले वचन मुख्यमंत्र्यांनी पुर्ण करावे असे आवाहन आ. अभिमन्यू पवार यांनी केले आहे.

दि. १६ आॅक्टोबर रोजी आ. अभिमन्यू पवार हे औसा – तुळजापूर पदयात्रा निमित्त आशीव व शिदांळा (लो) येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.यावेळी आ. पवार पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी दिले पाहिजे व फळबागांना एक लाख रुपये दिले पाहिजे होते असे शरद पवार बोलले होते मग आता पवार साहेब तुम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना सांगा ना शेतकऱ्यांकडे बघा जरा म्हणून आमचे सोयाबीन पुर्णपणे गेले आहे. अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान लातूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ात झाले आहे अतिवृष्टीने शेतकरी पुरता उध्वस्त झाला असताना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ नसणाऱ्या व अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारने केले आहे.सप्टेंबर महिन्यात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे औसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने यासाठी शेतकऱ्यांना मदत जाहिर केली. पण हि मदत अत्यंत तोकडी आहे. शासनाने हेक्टरी दाहा हजार रुपयांची मदत जाहीर केली पण एक एकर मधील सोयाबीन काढणीसाठी पाच ते सहा हजार रुपये लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यास सत्ताधाऱ्यांना सदबुध्दी द्यावी असे साकडे तुळजाभवानी ला घालण्यासाठी हि औसा ते तुळजापूर पायी दिंडी काढली आहे. यासाठी सोयाबीन पेंड्या व निवेदन आई तुळजाभवानी चरणी देवून मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे म्हणून साकडे घालणार आहे. असे त्यांनी सांगितले.

 

पदयाञेस उत्स्फूर्त प्रतिसाद… 

आ.अभिमन्यु पवार यांनी १६ आक्टोबर पासून औसा ते तुळजापूर पायी दिंडी काढली आहे. या पदयाञेला शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांचा हि उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान या यात्रेत उस्मानाबाद जिल्ह्य़ातून आ. राणाजगजितसिंहजी पाटील सहभागी झाले होते. तर या यात्रेला हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, हभप श्रीरंग महाराज औसेकर, माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर श्रंगारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे,माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार विनायक पाटील, गोपीचंद पडळकर,भाजपचे परभणी जिल्हा अध्यक्ष आनंदराव भरोसे,भाजपचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष अॅड नितिन काळे, सुधीर पाटील, आदींनी भेट देवून समर्थन केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here