उद्याचं आंदोलन यशस्वी करा
एस.एम देशमुख यांचं पत्रकारांना आवाहन
मुंबई : पत्रकारांवरील वाढते हल्ले, पाचोरयातील पत्रकाराला आमदार किशोर पाटील यांनी केलेली शिविगाळ, मारहाणीचा निषेध करण्यासाठी उद्या राज्यातील सर्व प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत पुकारलेले आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केले आहे..
अ. भा.मराठी पत्रकार परिषदेनं आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हे आवाहन करण्यात आलं आहे..
प्रसिध्दी पत्रकात पुढं म्हटलं आहे की, पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ले परत वाढले आहेत… पाचोरा येथील आमदाराने पत्रकारास केलेली शिविगाळ आणि केलेली मारहाण म्हणजे कायद्याचा कोणाला धाक राहिला नाही हेच दर्शवते.. याच्या निषेधार्थ राज्यातील प्रमुख अकरा पत्रकार संघटनांनी एकत्र येत उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे..
कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायदयाची होळी देखील उद्या होणार आहे.. या आंदोलन मराठी पत्रकार परिषद सर्व शक्तीनिशी सहभागी होत आहे.. त्याचबरोबर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडिया परिषद आणि परिषदेशी संलग्न जिल्हा, तालुका संघांनी आंदोलनात सहभागी होत आपल्या गावात जोरदार आंदोलन करावीत, आपली ताकद आणि एकजूट दाखवून द्यावी असे आवाहन एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे,कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी केलं आहे..
सर्व पत्रकार संघटनांनी आपले संघटनात्मक वाद बाजुला ठेऊन उद्याचं आंदोलन यशस्वी करावं, आपली एकजूट दाखवावी असं आवाहनही एस.एम.देशमुख यांनी केलं आहे…