पक्ष्यां करिता मूठभर धान्य तांब्याभर पाणी ठेवण्याचे आयुक्तांचे केले आवाहन
लातूर :–
उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी छतावर,अंगणात,झाडावर छोट्याशा पात्रात चिमणी विविध पक्षाकरिता मूठभर धान्य तांब्याभर पाणी ठेवण्याचे आवाहन लातूर महानगरपालिका आयुक्त डॉ अमन मित्तल यांनी नागरिकांना केले आहे .
ते सत्यशोधक डॉ संतुजी लाड यांच्या १८१ व्या जयंतीनिमित्त डॉ संतुजी लाड सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित छत्रपती शाहू महाराज उद्यानात पक्षा करिता पाणपोई उदघाटक प्रसंगी बोलत होते . या वेळी पोलीस उपअधीक्षक सुधीर खिडकर,नगरसेवक इम्रानभाई सय्यद,क्षत्रिय अधिकारी समाधान सुर्यवंशी, अँड प्रदीपसिह गंगणे अँड सुमित खंडागळे ,
डॉ संतुजी लाड सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजा माने आदींचा यावेळी प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या उपस्थितीत पक्षाकरिता पाणपोई उपक्रमाचे कौतुक करण्यात आले . या वेळी डॉ संतुजी लाड सार्वजनिक जयंती उत्सव समिती व लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीचे अँड आनंद सोनवणे,,दीपक गंगणे, मनिषाताई कोकणे,ताहेरभाई सौदागर,अँड रोहीत सोमवंशी, राहुल बनसोडे,अँड सुभेदार मांदळे,जमालोद्दीन मणियार,अँड नागेश जाधव,
बाबासाहेब बनसोडे,विशाल मोकाशे,बाळासाहेब वाघमारे, विजय गायकवाड,गौतम ससाणे,अभिमन्यू सूर्यवंशी, वामन बनसोडे, डॉ बालाजी रणक्षेत्रे, शिवाजी पाटील,प्रभाकर कुलकर्णी, कर्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार दीपक गंगणे यांनी मानले