निलंगा-(प्रतिनिधी)-
राजकीय क्षेत्रामध्ये माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनीच आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी दिली म्हणूनच आम्ही जिल्ह्यातील कुटूंबाच्या उंबरठ्यापर्यंत पोंहचू शकलो या कामामुळेच लातूर जिल्हापरिषदेला पंतप्रधान हा पुरस्कार मिळाला असे मत निलंगा येथे जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार प्रंसगी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हा गौरव म्हणजे नि:स्वार्थ सेवाभावचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लातूर जिल्हापरिषदेला नुकताच पंतप्रधान हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदार संघातील जिल्हापरिषदेत पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार यावेळी निलंगा येथे केला.
शासन-प्रशासन व त्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना या जनतेच्या सेवेसाठीच असतात. त्यामुळे या कार्यांमध्ये सेवाभाव जागृत केल्यास त्याचा योग्य लाभ समाजातील सर्व दुर्बल व गरजू घटकांना होतो. असाच प्रयत्न लातूर जिल्हा परिषदेमध्ये आम्ही केला आणि त्याचे फळ म्हणजे लातूर जिल्हा परिषदेला मिळालेला केंद्र सरकारचा पंतप्रधान पुरस्कार होत अशी भावना व्यक्त करत जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद लातूरे, माजी उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, माजी सभापती संजय दोरवे, गोविंद चिलगुरे, डाॕ. संतोष वाघमारे , प्रशांत पाटील,अरूणा बरमदे, पंचायत समितीचे माजी सभापती राधा बिराजदार, माजी उपसभापती अंजली पाटील,कालिदास पाटील,कोषाध्यक्ष अशोक शिंदे,सरचिटणीस जनार्धन सोमवंशी यासह आदीचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्याक्त केल्या. यावेळी भारतबाई सोळुंके म्हणाल्या की, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर,प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पन्नास टक्के आरक्षण असले तरी महीलांनी त्यांनी आम्हाला उमेदवारीची संधी दिली निवडूणही आणले परंतु या संधीचं सोनं आम्हाला करता आले. कोरोणा संसर्गासारख्या काळात अनेक पदाधिकारी आपले स्वतःचा जिव धोक्यात घालून सेवा केली आज हा पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे अन् ही संधी केवळ दुरदृष्ठी नेतृत्वामुळेच मिळाली अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
. लातूर जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमधून उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात असून अत्यावश्यक सुविधा असो वा लहान-सहान आजारांवरील उपचार, आरोग्य केंद्रांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी लातूर जिल्हा परिषद कायम प्रयत्नरत आहे. अंगणवाडी केंद्र यातील कामे, विविध पातळीवर सरकारकडून जाहीर झालेल्या योजनाची आमलबजावणी असे नियोजन केले गेले जाहीर झालेला हा पुरस्कार म्हणजे सर्व जि.प. सदस्य, अधिकारी व कर्मचारी बांधवांच्या सेवाभावनेचा एकप्रकारे गौरव आहे.