दिनविशेष
शास्त्रीय गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा आज जन्मदिन.
पंडित भीमसेन जोशी यांना लहानपणापासूनच
संगीतामध्ये रस होता. त्यांची कल्याण,तोडी, पुरिया, आणि मुलतानि इ. प्रसिद्ध ‘रागा’वर पकड होती. तसेच ते ठुमरीही अतिशय छान गात होते.’संतवाणी’ या नावाने मराठी अभंग गायनाचे त्यांनी हजारो कार्यक्रम केले आणि ते लोकप्रियदेखील झाले.
भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. पंडित भीमसेन जोशी यांचे खास निराळेपण असे की ते दक्षिणी भारतात
प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा
हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. असे वैशिष्ट्यपण असलेले गायन लोकांना श्रवणीय वाटत असे.
पंडित भीमसेन जोशी यांनी ‘तानसेन’, ‘सुर संगम’, ‘बसंत बहार’ आणि ‘अनकही’ सारख्या अनेक सिनेमांसाठी गायन केले. त्यांना भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण तसेच पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
विनम्र अभिवादन!