16.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*न्याहळतो मी आपुली 'छबी'…*

*न्याहळतो मी आपुली ‘छबी’…*

वाढदिवस विशेष

मित्रा,
आज तुझा वाढदिवस..
सगळे भरभरून बोलतील,लिहितील,खोटी स्तुती करतील..राजकारण्यांना भाट आजूबाजूला हवेच असतात..त्यांचा तो ड्रॉबॅक असतो..तू तुझी छबी,प्रतिमा आजपर्यंत जपत आला आहेस..शून्यातून उभारणाऱ्या माणसांना ती आणखी जपावी लागते..कारण बघणारे अनेक डोळे बघत असतात मात्र सांगण्याचे धाडस कधीही करत नसतात..त्यांना आपल्या मनातल्या माणसाला दुखवायचे नसते..म्हणून तो दुरूनच आपल्या मनात त्या प्रतिमेला जपत असतो..तू ठरवून राजकारणात आलास..तुझा पिंड नसताना तू कामाच्या झपाट्यात जगत राहिलास..चुका काम करणाऱ्यांच्याच होत असतात..तू काही ब्रह्मदेव नाहीस..तुझ्या घरात काही राजकारणाचा वारसा नाही..त्यामुळे तू जे करतोयस ते तोलून मोलून करतोयस..प्रवाहाच्या बरोबर काही शिंतोडे उडत राहणार..

मोह,माया समान्याप्रमाणे होत राहणार..पण तुझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन सरळ आहे..तू जसा मतदारसंघात आलास तसाच जनतेला हवा आहेस..कामासठी पछाडलेला,रास्ते विकासासाठी धडपडणारा,अर्ध्यारात्री फोन उचलणारा,मदतीला धावणारा,आपल्यातला वाटणारा,सगळ्या धर्माला,जातीला आपला वाटणारा,सामान्य घरातला सामान्य माणूस असलेला,असाच तू आजही आम्हाला हवा आहेस..काही चुका होत आहेत,त्यात सुधारणा करून तू राहायला हवं असंही अनेकांना आजही वाटत आहे..आजूबाजूचं काही “कोंडाळ”थोडं बाजूला सारायला हवं..

सामान्य कार्यकर्त्यांत आणि तुझ्यात निर्माण होणारी दरी थांबायला हवी..लोकांना डायरेक्ट अँप्रोच आवडतो..आता नेता आमच्यातला हवा असतो..आम्हाला सहज उपलब्ध होणारा हवा असतो..अपॉइंटमेंट घेऊन भेटणाऱ्या पुढाऱ्यांचा जमाना संपत आलाय..सहज उपलब्ध होणारा नेता आता जनतेला हवाय..एखादे काम नाही झाले तर चालेल,मात्र भेटून गेल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायला हवा..तुझा समोरासमोर अधिकाऱ्यांना निरोप देण्याचा गुण उत्तम आहे..तू लगेच सोल्युशन देणारा नेता आहेस,अनेकजण खुश होऊन तुझ्याकडून जातात..प्रचंड निधी खेचून आणणारा नेता तू आहेस,तरीही काही कार्यकर्ते नाराज का आहेत?याचा शोध घेऊन त्यांना सोबत घ्यायला हवे..चार महिन्यात निवडणुका होतील,तुझ्यासमोर येणाऱ्या उमेदवाराला जनताच बोलली पाहिजे,त्याला कामाचा हिशोब विचारली पाहिजे..झालेल्या कामाचे ऑडिट जनतेसमोर मांडायला हवे..केलेली कामे त्यांना दिसायला हवीत..लोक विसारभोळे असतात,त्यांना कालचे लक्षात राहत नाही,आपली एखादी टीम सातत्याने त्यांना सांगणारी हवी..नवे कार्यकर्ते जोडून त्यात आत्मविश्वास निर्माण करायला हवा..गावाच्या वेशीवर तू केलेल्या कामाची यादी लागायला हवी..कोट्यवधींची कामे जनतेला दिसायला हवीत..तू साडेचार वर्षात मतदारसंघाला भरपूर दिलेले आहे,मात्र ज्या कार्यर्त्यावर तुझा विश्वास आहे,ते जनतेला पटवून देण्यात कमी पडत आहेत,त्यांनी ते सांगायला हवे..दोन्ही डगरीवर हात ठेवणारे कार्यकर्ते नाराज झाले तरी चालतील त्यांना बाजूला करून स्पष्ट बोलणाऱ्या कार्यकर्त्याना जवळ करायला हवे..आताच विरोधात गेले तर चालतील मात्र सोबत राहून धोका देणारी मंडळी आताच बाजूला गेली तर होणारा धोका तर टाळता येणार आहे..तुझ्यासारखा कामपीपासू कामदार आमदार लोकांना हवाय मात्र आपल्याच लोकांमुळे धोका होणार नाही याची काळजीही तुला घ्यायला हवी.

.लोकसभा आणि विधानसभा दोन्ही वेगळ्या असतात,इथे हक्काचा आपला आमदार लोकांना हवा असतो..काम हेच तुझे शस्त्र आहे,त्यामुळे त्याच जोरावर तू लढाई जिंकणार आहेस,त्यावर जोर देऊन केलेल्या कामांची उजळणी लोकांसमोर ठेवायला हवी..जुन्या अनेक कार्यकर्त्यांनी घर धरलंय, खाजगीत ते फारसे समाधानी दिसत नाहीत,त्यांनाही सोबत घेऊन नव्यासोबत त्यांची सांगड घालायला हवी,त्यांना केवळ मानसन्मान हवाय,त्यांना सोबत घ्यायला हवे..अनेक मुस्लिम बांधवही तुझ्यासोबत काम करत असलेले पाहून एक नवा पॅटर्न निर्माण केल्याचे समाधान वाटते,त्यांची पुन्हा नव्याने मोट तुला बांधायला हवी..गावपातळीवर अनेक जुनी मंडळी असते त्यांना व्यासपीठावर बोलवायला हवे..औसा तालुक्याला कामदार आमदार हवाय,त्यामुळे कामच बोलणार आहे..

आपलीच छबी आपणच न्याहाळताना काही बघणारे डोळे आपल्याकडे असतात,याचे भान ज्याला असते तोच यशस्वी होतो…जे आवडले नाही ते माझ्या पदरात टाक, जे आवडले ते मनात ठेव,ज्यात सुधारणा करायच्या आहेत त्या आठवणीत ठेवून कर..तुला आभाळभर शुभेच्छा…मित्रा खूप मोठा हो…

@ संजय जेवरीकर

( लेखक हे पत्रकार ,कवी व राजकीय विश्लेषक आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]