राज्यातील सर्व शाखांवर होणार निट पॅटर्न नुसार पेन-पेपर ऑफलाईन परिक्षा..!
नांदेड – ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातून सर्वाधिक एमबीबीएस घडवणारा महाराष्ट्राचा महाबॅण्ड आयआयबी च्या वतीने दरवर्षी हजारो हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना मागील दशकभरापेक्षा अधिक काळापासून स्कॉलरशिप दिली जाते. आयआयबी फास्ट परीक्षेच्या गुणांच्या आधारे स्कॉलरशिप यासोबतच आयआयबी च्या संकल्प, मिनिसंकल्प व इतर सुपर स्पेशल आणि स्पेशल बॅचेस साठी विद्यार्थी निवडले जातील. हि निवड तात्पुरत्या स्वरुपाची असून दरमहा होणाऱ्या जम्बो परीक्षेच्या गुणांवरून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच स्पर्धा निर्माण केली जाते..
संपूर्ण भारतात निकालाच्या माध्यमातून स्वतःचा वेगळा उच्चांक निर्माण केलेल्या आयआयबी ने आतापर्यंत अनेक उच्चांक प्रस्थापित केले असून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये आयआयबी च्या ७०+ विद्यार्थ्यांना देशातील नामांकीत एम्स महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. महाराष्ट्रातून हे पहिल्यांदाच झाले असून या निकालासाठी देशभरातून आयआयबी चे कौतुक केले जात आहे…
विद्यार्थ्यांना टेस्ट आणि स्टडी मटेरियल च्या माध्यमातून ६०,००० पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव करता आला आणि त्याच बरोबर याठिकाणी घेण्यात आलेली प्रत्येक सराव परिक्षा ही मुख्य ‘नीट’ परिक्षेच्या धर्तीवर घेण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याबळावर विद्यार्थ्यांनी ‘नीट’ चा टप्पा यशस्वीपणे पेलला असे मत या प्रसंगी आयआयबी चे मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यांनी व्यक्त केली ..
परीक्षेबद्दल सविस्तर माहिती —-
परीक्षा दिनांक : रविवार रोजी, १९ मे २०२४
परीक्षा पद्धत : पेन व पेपर (ऑफलाईन)
परीक्षा पॅटर्न : फास्ट परीक्षा ही नीट पॅटर्न वर आधारित असेल
वेळ व ठिकाण : (नोंदणीकृत विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत नंबर वर एसएमएस द्वारे कळवले जाईल)
रिपीटर्स पहीली बॅच २७ मे व ११ वी निट साठी ३ तर ११ वी जेईई / सिईटी साठी ५ जून २०२४ पासून नवीन बॅच असतील.