पञकार रामचंद्र ठिकणे,
सागर बाणदार , डॉ.ओंकार निंगनुरे ,नजमा शेख ,सौ.नंदा नार्वेकर यांच्या नावाचा समावेश
इचलकरंजी 🙁 प्रतिनिधी )–माणकापूर येथील सामाजिक ,कला – सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेल्या निसर्गराजा ग्रुपच्या वतीने महाशिवरात्र उत्सव व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आले.

यामध्ये जेष्ठ पञकार रामचंद्र ठिकणे यांना पञकार भूषण प्रेरणा पुरस्कार, जेष्ठ फोटोग्राफर छोटूसिंग रजपूत यांना उत्कृष्ट प्रेस फोटोग्राफर प्रेरणा पुरस्कार , पञकार सागर बाणदार यांना आदर्श पञकार प्रेरणा पुरस्कार,नजमा शेख यांना आदर्श समाजसेवा प्रेरणा पुरस्कार ,सौ.नंदा नार्वेकर यांना आदर्श नारीशक्ती प्रेरणा पुरस्कार ,तानाजी बिरनाळे यांना उत्कृष्ट पञकार प्रेरणा पुरस्कार ,सौ.सुवर्णा पवार यांना काव्यभूषण प्रेरणा पुरस्कार , डॉ.ओंकार निंगनुरे यांना वैद्यकीय सेवारत्न प्रेरणा पुरस्कार ,श्रीमती नंदिनीताई कदम यांना समाजभूषण प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आले

असून अन्य व्यक्तींनाही शुक्रवार दि.८ मार्च रोजी एका शानदार कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून याचवेळी निवडक कवींचे कवी संमेलनही होणार असल्याची माहिती निसर्गराजा ग्रुपचे अध्यक्ष पञकार शिवाजी येडवान यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना दिली.

निसर्गराजा ग्रुपच्या वतीने सामाजिक,कला – सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रात अविरतपणे कार्यरत राहून समाज विकासात योगदान देण्याचा प्रयत्न केला जातो.विशेष म्हणजे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची ब-याच वर्षांपासूनची परंपरा ग्रुपने आजही कायम राखली आहे

.यंदाच्या वर्षी देखील या ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम शुक्रवार दि.८ मार्च रोजी सकाळी १० वाजता श्री मलकारसिध्द मंदिर, माणकापूर( ता.निपाणी ) येथे होणार असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रुपचे अध्यक्ष पञकार शिवाजी येडवान यांनी केले आहे.यावेळी ग्रुपचे उपाध्यक्ष विठ्ठल काटकर , सचिव विजय शिंदे , कार्याध्यक्षा श्रीमती मंगल कोळी यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

