निळू फुले यांना अभिवादन

0
151

#निळूभाऊ : भूमिकेतील खलनायक पण

 माणूस मात्र ग्रेटच , विनम्र अभिवादन …!!! 

आपल्या अफाट अष्टपैलू अभिनयाच्या गुणांवर कायमस्वरूपी ठसा उमटवलेला गंभीर प्रवृतीचे अभिनेते म्हणजेच निळू फुले…

निळू फुले यांनी ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केलं … ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत तसेच रंगभूमीवर कारकीर्द गाजवली …

अनंत माने दिग्दर्शित ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातील झेले अण्णांच्या भूमिकेनं त्यांना चित्रपट व्यवसायात ओळख मिळवून दिली… निळू फुले यांनी बारा हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या … तर मराठीतील जवळपास १४० चित्रपटांमधून काम केलं आहे…

निळू फुले यांची नाट्य अभिनयातील आठवणीत राहणारी होती … सखाराम बाईंडर, जंगली कबूतर, सूर्यास्त, बेबी या नाटकांतील त्यांचा अभिनय विशेष उल्लेखनीय होता … चित्रपटातील त्यांची वाटचाल खूपच मोठी आहे … सामना, शापित, सोबती, पुढचं पाऊल, सिंहासन, भुजंग आशा कितीतरी चित्रपटातील त्यांच्या भूमिकांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य केलं …

व्यावसायिक गरज म्हणून काही चित्रपट स्वीकारणे त्यांना भाग पडते होते … त्याही चित्रपटातील भूमिकांना त्यांनी समर्थपणे न्याय दिला… हिंदी भाषेतील निर्माणत्यांशी जुळवून घेता न आल्यानं आपण तेथे फार रमलो नाही असे ते म्हणतं … ‘कुली’ चित्रपटात त्यांनी साकारलेली अमिताभच्या वडिलांची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहे … इतरही काही हिंदी चित्रपटातून त्यानी भूमिका साकारल्या अन त्या अभिनयाच्या जोरावर अजरामर केल्या … पण त्यांची खरी ओळख मराठी चित्रपटातील अभिनयानेच बहरलेली दिसते … बराच काळ खलनायक वा दृष्ट वृत्तीच्या भूमिका केल्यानं त्यांची ओळख खलनायक अशीच झाली पण त्यांनी मिळालेल्या प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं … त्य प्रत्यक्षात ते कमालीचे गंभीर प्रवृतीचे होते … वाचनातून त्यांची मूळ प्रवृती अधिकच जपली होती …

नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचं ग्रामीण आणि शहरी जीवनाचं निरीक्षण अतिशय अचूक होतं … या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला… सहज , सुंदर अभिनय करणाऱ्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला…

निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे मिळाला … साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार, ‘सूर्यास्त’ या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार… जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार आशा कितरी पुरस्काराचा त्यात समावेश आहे … निळूभाऊ यांचं १३ जुलै २००९ रोजी निधन झालं …अन एक अभिनयाचं विद्यापीठ कायमचं नजरेआड गेलं …

. यशवंत भंडारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here