माजी मुख्यमंञी तथा कर्मयोगी स्व.डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या भव्य-दिव्य स्मारकाच्या अनावरणासाठी महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणात निलंगेकरांच्या हस्ते पुजनाने सभामंडपाच्या कामाची सुरुवात
निलंगा-(प्रशांत साळुंके)-महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील माजी मुख्यमंञी तथा कर्मयोगी स्व.डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या भव्य स्मारक अनावरण सोहळ्याच्या सभामंडपाच्या कामाची सुरुवात भाजपाचे माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर,प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,भागवत पौळ,दिलीप धुमाळ, कोलपुके,प्रशांत गायकवाड,सुरेंद्र धुमाळ,भरत गोरे,बाबुराव बोञे-पाटील आदींची उपस्थिती होती.
माजी मुख्यमंञी तथा कर्मयोगी स्व.डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या भव्य स्मारकाचे अनावरण सोहळ्यासाठी गुरूवार दि.9 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे आयोजित या सोहळ्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची हजेरी असणार आहे.
राज्याच्या जलसिंचनाचे प्रणेते व लातूर जिल्हयाचे भाग्यविधाते कर्मयोगी म्हणून ओळखल्या जाणारे माजी मुख्यमंञी अष्टपैलू व्यक्तिमहत्त्व स्व.डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण माजी केंद्रीय गृृृहमंञी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते हेणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंञी रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंञी सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंञी अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकुर आदीसह राज्यातील बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
तरी या स्मारकाच्या अनावरणासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निलंगेकर परिवाराने केले आहे.
निलंगा येथे बुधवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन..
– महाराष्ट्राचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंती व पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने निलंगा येथील कुडुंबले हॉस्पिटल च्या वतीने बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी मोफत आरोग्य तपासणी , सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कै. डॉ. मल्लिकार्जुन कुडुंबले यांच्या निलंगा येथील कुडुंबले हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी, सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टराकडून मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग ,दमा, अस्थमा, ॲलर्जी, लठ्ठपणा, थायरॉईड, छातीचे विकार ,न्योमोनिया, संधिवात, वातरोग, लिव्हर, वृध्दापकाळातील त्रास, मेंदूज्वर, लकवा, महिलांची अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व तपासणी, प्रसुतीपूर्व आणि प्रसूती पश्चात आजारांवर मोफत उपचार , तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात रुग्णांच्या गरजेनुसार ईसीजी, रक्त व लघवीची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. बुधवार दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेतकुडुंबले हॉस्पिटल
शिवाजी नगर निलंगा येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.विक्रम कुडुंबले, डॉ.प्रियंका कुडुंबले, डॉ.साईनाथ कुडुंबले , डॉ.सुधा कुडुंबले , सेवानिवृत्त आरोग्य उपसंचालक डॉ.एस.एस.पाटील आदींनी केले आहे.