माजी मुख्यमंञी डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण सोहळा माजी केंद्रीयमंञी शिवराज पाटील चाकूरकर व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार…
निलंगा-(प्रतिनिधी)-माजी मुख्यमंञी डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण सोहळा माजी केंद्रीयमंञी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत दि.9 फेब्रुवारी 2023 गुरूवारी रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीयमंञी रावसाहेब दानवे,माजी मुख्यमंञी सुशिलकुमार शिंदे,माजी मुख्यमंञी अशोक चव्हाण,राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील,श्रीमती सुशालाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा संपन्न होणार आहे.यावेळी खासदार,माजी खासदार,आमदार,माजी मंञी व अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.
कर्मयोगी माजी मुख्यमंञी डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक समितीच्या सदस्या माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर,डाॅ.सौ.चंद्रकला अरूण डावळे,डाॅ.शरद पाटील निलंगेकर,प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर,विजय पाटील निलंगेकर,माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर,प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर हे अनावरण सोहळ्यासाठी पुढाकार घेत आहेत.