आमदार निलंगेकर यांच्या उमेदवारीला माझाही पाठींबा
निलंगा मतदारसंघाचे अधिवेशन उत्साहात संपन्न!
निलंगा-(प्रतिनिधी)-निलंगानगरीतील वृंदावन मंगल कार्यालय येथे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे अधिवेशन राज्याचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. हजारोंच्या संख्येने जमलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्नेहीजनांचा उत्साह यावेळी सर्वांना ऊर्जा देणारा ठरला.
निलंगा मतदारसंघाचे अधिवेशन हा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम असून या माध्यमातून निलंगा मतदारसंघातील जनतेने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उमेदवारीचा ठराव मांडला आहे. यातून त्यांची लोकप्रियता सिद्ध होते. त्यामुळे हा स्तुत्य उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्यासारखा असून पक्षाने देखील यातून बोध घेऊन असे उपक्रम प्रत्येक मतदारसंघात राबवावेत, अशा शब्दात प्रा. शिंदे यांनी या अधिवेशनाचे कौतुक केले.
तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आमदार निलंगेकर यांचे काम हे निश्चितच वाखाणण्याजोगे असून पक्षासाठी देखील त्यांनी केलेले कार्य तितकेच श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहे. मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारीचा माझा ठरावा असून आगामी काळात यासंबंधी पक्षश्रेष्ठींकडे नोंद देईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचे काम केले आहे. या निधीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामाचा लेखाजोखा सर्वसामान्य जनतेपर्यंत मांडण्यासाठी लवकरच मतदारसंघाचे परिक्रमा करणार असल्याची माहिती सर्वांना दिली. तसेच माझ्या उमेदवारीचा ठराव घेतल्याबद्दल निलंगा विधानसभा मतदारसंघातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आ.राम शिंदे यानी आभार व्यक्त केले.
यावेळी प्रसंगी भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे, निलंगा शहराध्यक्ष ऍड. वीरभद्र स्वामी, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, विधानसभा प्रभारी दगडू सोळुंके, जिल्हा बँकेचे संचालक भगवान पाटील तळेगावकर, शेषेराव ममाळे, बाजार समितीचे संचालक शिवकुमार चिंचनसुरे, नरसिंग बिरादार, माजी जि.प. सभापती गोविंद चिलकुरे, सुनिल पंढरीकर आदींसह पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूर विधानसभेसाठी संभाजी पाटील यांचा विचार व्हावा
लातूर शहर येथूनही उमेदवारीचा विचार पक्षाने गांर्भीयाने करावा राज्यभर नेतृत्व करण्याची आमदार निलंगेकर यांची क्षमता आहे.तरी पक्षाने विचार करून लातूर शहर विधानसभेसाठी त्यांचा विचार करून त्याना उमेदवारी द्यावी असाही ठराव आ.राम शिंदे यानी यावेळी मांडताच उपस्थितानी टाळ्या वाजवून समर्थन दिले.
विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने निलंगा येथे आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात माजी मंञी आ.राम शिंदे यांनी काॅंग्रेला टक्कर देण्यासाठी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्या या सूचनेने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
‘पक्षाने ठवरलं तर तुम्हाला लातूर शहर विधानसभा मतदारसंघातूनही निवडणुक लढवावी लागेल.याबाबतही तयारी ठेवा,अशा सूचना माजी मंञी आ.राम शिंदे यांनी निलंगा येथे संभाजीराव पाटील निलंगेकर यांना केली.पुढे ते म्हणाले,विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकवेळा जनतेला पसंती नसलेल्या उमेदवाराची उमेदवारी लादली जाते.माञ जनतेच्या मनातला उमेदवार असणे गरजेचे आहे.निलंगा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनात कोण उमेदवार आहे.यासाठी या घातलेल्या या अधिवेशनाचा उपक्रम राज्याला दिशा देणारा आहे.
लातूर जिल्ह्यातून एकीकडे माजी मुख्यमंञी डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर,माजी मुख्यमंञी विलासराव देशमुख,केंद्रीय मंञी शिवराज पाटील चाकूरकर काॅंग्रेसचे दिग्गज होते.येथील राजकारणात काॅंग्रेसचे वर्चस्व होते.अनेक वर्षापासूनचे असलेले वर्चस्व मोडून जिल्हा परिषद,महानगरपालिका,पंचायत समिती,बाजार समित्या,नगरपरिषदा भाजपाकडे खेचून आणल्या आहेत,असे माजी मंञी आ.राम शिंदे म्हणाले.