माजी मुख्यमंञी तथा कर्मयोगी स्व.डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या भव्य स्मारकाचे अनावरण सोहळ्यासाठी सर्वपक्षीय नेते निलंगा येथे जमणार..
निलंगा-(प्रतिनिधी)- माजी मुख्यमंञी तथा कर्मयोगी स्व.डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या भव्य स्मारकाचे अनावरण सोहळ्यासाठी गुरूवार दि.9 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे आयोजित या सोहळ्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची हजेरी असणार आहे.
राज्याच्या जलसिंचनाचे प्रणेते व लातूर जिल्हयाचे भाग्यविधाते कर्मयोगी म्हणून ओळखल्या जाणारे माजी मुख्यमंञी अष्टपैलू व्यक्तिमहत्त्व स्व.डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण माजी केंद्रीय गृृृहमंञी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते हेणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस असतील.तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंञी रावसाहेब दानवे,माजी मुख्यमंञी सुशिलकुमार शिंदे,माजी मुख्यमंञी अशोक चव्हाण,राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
माजी मुख्यमंञी तथा कर्मयोगी स्व.डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर हे 3 जुन 1985 ते 6 मार्च 1986 दरम्यान महाराष्ट्र राज्याचे ते दहावे मुख्यमंञी होते.या शिवाय त्यांनी राज्यमंञिमंडळात सार्वजनिक बांधकाम,पाटबंधारे,संसदीय कार्य,आरोग्य,तंञशिक्षण,दुग्धविकास,विधी व न्याय,सहकार,सांस्कृतिक कार्यमंञी अशी विविध पदे भूषविली होती.मुख्यमंञीपद भूषविल्यानंतर सुशिलकुमार शिंदे यांच्या मंञिमंडळात त्यांनी महसूल खात्याचा कारभार पाहिला होता.1990 ते 1991 या काळात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
निलंगा विधानसभा मतदारसंघाचे ते पहिल्यांदा 1962 मध्ये आमदार म्हणून निवडून गेले होते.पक्षाची पडझड होत असतानाही त्यांनी कधीही निष्ठा बदलली नाही.सिंचनात त्यांनी केलेले काम दिशादर्शक आणि समाजोपयोगी केले आहे.मागास भागाचा उत्कर्ष व्हावा यासाठी ते कायम झटले.लातूर,जालना हे जिल्हे आणि औरंगाबाद खंडपीठाच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
निलंगासारख्या मागास भागात शिक्षणाची गंगा नेत,त्यांनी शैक्षणिक संस्था उभारली शिवाजीराव हे प्रबंध लिहून डाॅक्टरेट मिळविणारे ते पहिले मुख्यमंञी होते.त्यांनी शोधप्रबंधात मराठवाड्याच्या विकासाचा वेध घेतला.एम.ए आणि एल.एल.बी. या दोन्ही पदव्युत्तर पदव्या त्यांनी मिळविल्या.त्यांच्या या कार्याची आठवण आणि गौरव म्हणून निलंगा येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.दि.9 फेब्रूवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजता जयंतीदिनी या स्मारकाचे अनावरण होत आहे हे विशेषत्त्वाने पाहीले जाते.