आ.अभिमन्यू पवार,अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या पॕनलचा धुराळा
निलंगा-(प्रतिनिधी)-
निलंगा व औराद शाहजानी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी पालकमंञी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजप सेना युतीच्या अरविंद पाटील निलंगेकर परीवर्तन पॕनलने एकहाती विजय मिळवत विरोधकांच्या चारीमुंड्या चित करत आमदार अभिमन्यू पवार आणि अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या दोन्ही पॕनलचा धुराळा उडवला आहे.
संभाजी पाटील निलंगेकर यांनी विरोधकांना धूळ चारत औरद शहाजनी आणि निलंगा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. तर निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकाल एकहाती मिळवली आहे.
निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीत संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पॅनलने १८ पैकी १८ जागत जिंकत अभिमन्यू पवार आणि महाविकास आघाडी यांच्या पॅनलला चारी मुंड्या चित केले आहे. तर औराद कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ पैकी पैकी १८ जागी विजय मिळवत भाजपाने महा विकास आघाडी व अभिमन्यू पवार यांच्या दोन्ही पॕनलचा धुराळा उडवला आहे.
या विजयाचे शिल्पकार ठरलेले आमदार संभाजीराव पाटलाचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर या विजयाचे खरे शिल्पकार ठरले मागील काही दिवस आरोप प्रत्यारोप होत होते. परंतु निवडणुकीचा निकाल लागला आणि वाद संपला. माझे आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत असे मत अरविंद पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले. तसेच हा विजय कर्मयोगी स्वर्गीय डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या चरणी अर्पण करत असल्याचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर सांगितले.
निलंगा बाजार समिती निवडणूकीत सहकारी मतदार संघातून शिवकुमार चिंचनसुरे, गुंडेराव जाधव, श्रीरंग हाडोळे, अरविंद पाटील जाजनूरकर, लालासाहेब देशमुख, दयानंद मुळे, रामकिशन सावंत, भागीरथी जाधव, कस्तूरबाई जाधव, मन्मथ स्वामी, काशीनाथ जाधव, किशराव म्हेञे, तर ग्राम पंचायत मतदार संघातून रोहित पाटील, तुकाराम (जनार्धन) सोमवंशी, अनिल कांबले, हणमंत पाटील, व्यापारी मतदार संघातून संतोष बरमदे, योगेश चिंचनसुरे व हामाल तोलारी मतदार संघातून सतिश कांबळे यांना व महाविकास आडीच्या उमेदवाराला समान मते पडली होती टाॅस करून कांबळे विजयी झाले आहेत.
औराद शाहजानी कृषी उत्पन्न बाजार समितीवरही भाजपाने एकहाती सत्ता मिळवत १८ जागेवर विजय मिळवला आहे
औराद शाहजानी सहकार मतदार संघातून नरसिंग बिराजदार,शाहूराज थेटे, वाघजी पाटील, तुकाराम पाटील, अनंत बोंडगे, धनराज माने, नागनाथ स्वामी, रंजना शिंदे, अर्चना गोवंडगावे, कालिदार रेड्डी, सुरेश बिराजदार तर ग्राम पंचायत मतदार संघातून शाहूराज पाटील, बंकट बिरादार, राम काळगे, संजय दोरवे, हमाल तोलारी मतदार संघातून राहूल सुर्यवंशी व व्यापारी मतदार संघातून निर्भय पिचारे सतीश देवणे हे विजयी झाले आहेत.
पॕनल प्रमुख अरविंद पाटील निलंगेकर
हा भाजप सेना युतीचा विजय कर्मयोगी स्वर्गीय डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या चरणी अर्पण करत असून आता निकाल लागला विषय संपला आम्हाला कोणावरही टीका करायची नाही. यापुढे फक्त विकासाचे राजकारण करू आणि निलंगा व औराद शाहजानी बाजार समितीमध्ये बदल घडवून दाखवू असे आश्वासन दिले.