हजारोंच्या साक्षीने आ.निलंगेकर दाखल करणार उमेदवारी अर्ज
भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची विशेष उपस्थिती
निलंगा/प्रतिनिधी: निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर मंगळवारी (दि.२९) हजारो नागरिक व मतदारांच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जेष्ठ नेते भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर आशीर्वाद सभेचे आयोजनही करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक सभेसाठी तीनही तालुक्यातील भजनी मंडळे,गणेश मंडळे, आराधी मंडळे,वारकरी व दुर्गा मंडळे तसेच नागरिक आणि मतदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपासह महायुतीतील सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हजारो युवक-युवती व मतदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने व त्यांचा आशीर्वाद घेऊन आ. निलंगेकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आ.निलंगेकर यांनी संपूर्ण मतदारसंघाचे दौरे करून नागरिकांचा प्रत्यक्ष आशीर्वाद घेतला आहे. विविध गावात जन आशीर्वाद सभा,नागरिक व मतदारांचे मेळावे, महिला मेळावे,बचत गटांच्यामहिलांचेमेळावे,गणेशमंडळाचेपदाधिकारीतसेचयुवकमंडळाच्यापदाधिकाऱ्यांशीसंवादाचेकार्यक्रम,व्यापारी,वकील तसेच विविध समाज घटकांसोबत बैठका झालेल्या आहेत.
मागील काळात राबविलेल्या विविध विकासकामांची लोकार्पणे व मंजूर झालेल्या योजनांची भूमिपूजने झाली आहेत.वाडी – तांड्यावरील प्रत्येकाचे मत जाणून घेत आगामी कार्यकाळात राबवावयाच्या विकास योजनांचा आराखडा आ.निलंगेकर यांनी तयार केलेला आहे.विकास कामांची गती कायम राखत निलंगा मतदार संघाला नव्या उंचीवर पोचविण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
निलंगा,शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्याचा समावेश असणाऱ्या निलंगा मतदार संघाचा विकास करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. जनतेच्या आशीर्वादानेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे.जनतेने आजपर्यंत अपार प्रेम केले आहे.प्रत्येक कार्यात साथ दिली आहे.यावेळीही पुन्हा एकदा आपली साथ आणि सहकार्य तसेच आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे आहेत. आजपर्यंत आपण जो विश्वास दाखवला त्या बळावरच ही वाटचाल सुरू असून मंगळवारी होणाऱ्या आशीर्वाद सभेस आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे.